सातारा ः येथील श्री उत्तर चिदंबरम नटराज मंदीराच्या महारुद्र,महाशिवरात्री संगीत व नृत्यमहोत्सवात सातारच्याच नटराज कला शाळा नृत्यसंस्थेच्या गुरु सौ. आंचल घोरपडे यांच्यासह 30 कलाकारांनी भरतनाट्यम नृत्याचे बहारदार सादरीकरण केले.त्यानंतर रात्री ब्ल्यु नोट गिटार क्लासेसच्या कलाकारांनी सादर केलेल्या गायन,वादनाच्या फ्ुयजनने महोत्सवाची सांगता केली.याचवेळी 5 युवा चित्रकारांनी विविध विषयांवर चित्रे काढत व एका छोट्या मुर्तीकाराने नटराजाची मूर्ती बनवत एक अनोखा अविष्कार साकारला.
दरम्यान या महाशिवरात्री निमित्त आयेाजीत केलेलेया धार्मीक कायर्ंक्रमात तसेच बर्फाचे शिवलिंगाचे दर्शनासाठी सातारच्या जिल्हाधिकारी सौ.श्वेता सिंघल,सहाय्यक धर्मादाय आयुक्त ईश्वर सुर्यवंशी व वाहतुक शाखेचे पोलीस निरीक्षक सुरेश घाडगे यांनी मंदिरास सायंकाळी परिवारासह भेट देत बर्फाचे शिवलिंगाचे दर्शन घेतले. तसेच मंदिराच्या विविध उपक्रमाचे कौतुक केले.यावेळी या सर्व मान्यवरांचा सत्कार मंदिराचे विश्वस्त रमेश शानभाग,सौ.उषा शानभाग यांचे हस्ते शाल,श्रीफळ देउन करण्यात आला.
नटराज नृत्यशाळेच्या कलाकारांनी नटराज मंदिरातील परमपूज्य शंकराचार्य श्री चंद्रशेखरेंद्र सरस्वती महास्वामी कला मंदंीराच्या भव्य स्टेजवर आपल्या नृत्यकार्यक्रमाची सुरुवात ..गणेश कौतुकम.. या नृत्याने केली.त्यानंतर अलारिपू सादर होउन ..नम: शिवाय.. हे शिवपंचाक्षर स्तोत्र सुरेख सादर होउन बहारदार कुचीपुडी नृत्याची अदाकारी झाली.जतीस्वरम हे रागमालिका रागात आणि मिश्र चापु तालात सादर होउन अडावू नृत्य सादर झाले. महागणपती स्तोत्रावर नृत्य सादर होउन प्रवास करताना हा प्रवास चांगला व्हावा यासाठी भगवान शंकराला आळवणी करणारे अनवट असे ..मार्गबंधू स्तोत्र.. सादर झाले.कनकसभेतील..नटनम आडीनार..सादर होउन पुरंदरदासांची कन्नड कालाकृती .. आडिदनुरंगा.. हे नृत्य झाले. तामीळ भाषेतील श्री बालमुरली कृष्णाचे ..आडू चिदंबरम.. हे नटराजाचे वर्णन करणारे नृत्य अतिशय बहारदार सादर होउन 5 मालांचा समुह असणारे ..रजनी मृदु पंकज लोचनी.. ही देवी स्तुती सादर होउन तमीळ भाषेतील ..नटेश कौतुकम.. सादर होउन कृष्ण स्तुतीतील पदम हा शास्त्रीय नृत्य प्रकार सादर होत कनदकुतुहल रागातील आदीतालातील तिल्लाना व मंगलमने या कायर्ंक्रमाची सांगता केली.
बेळगाव येथील गुरु आर.मोहन राव यांची शिष्या असलेल्या ऑचलने गेली 18 वर्षे आपली ही नृत्य साधना सुरु ठेवली आहे.
गिटार वादन व गायन कार्यंक़्रमात सौै उषा शानभाग यांनी रागदारी गात त्यात संत त्यागराजांची रचना असलेले अभेरी रागातील व हिंदुस्थानी शास्त्रीय गायनातील भीमपलासमधील ..नधू मोमु.. हे पद सादर केले. नंतर संत तुलसीदासांचे अहिर भैरव रागातील ..पिब रे राम रसम.. पद सादर होउन रंजनी रागतील देवी किर्तन सादर झाले.कानडी भाषेतील कर्ण रंजनी रागातील.. ओ नटराजा.. हे नटराजाचे वर्णन करणारे पद सादर होउन शिवरंजनी रागातील शिवस्तुती.. तुजवीण शंभो मज कोण तारी.. अतिशय सुरेख वाद्यांच्या व गायनाच्या मिलापातुन साकारले गेले. श्री कृष्णाचे वर्णन असलेले अडाना रागातील ..होरी धमार.. सादर होउन वृंदावनी सारंग रागातील ..हरी रमणा.. हा अभंग सादर होउन तराणा अर्थात भेैरवीने या वादन व गायनाची सांगता झाली. यावेळी गायन साथ सौ.उषा शानभाग यांनी तबला साथ शांताराम दयाळ,बेस गिटार वर चैतन्य देशपांडे,प्रमुख गिटारवादन प्रतिक सदामते व व्हायोलीनवर साथ चंद्रकांत पंडीत सरांनी केली.
नृत्यामध्ये सहभागी झालेल्या गुरु सौ.आंचल घोरपडे व 30 शिष्यांंसह चित्रकार व मूर्तीकार शुभम शिंदे,मिहीर कुंभारे,मोक्ष घेारपडे, चैतन्य कांबळे,आकाश राजे यांचा सत्कार सातारा शिवसेना शहर प्रमुख निमिष शहा व त्यांच्या पत्नी सौ.मीनल शहा यांचे हस्ते मानचिन्ह व प्रशस्तीपत्रे देवुन करण्यात आला.यावेळी नटराज,मंदीराचे विश्वस्त रमेश शानभाग,मुकुंद मोघे,रणजीत सावंत,के.नारायण राव,वासुदेवन नायर,मंदिराचे व्यवस्थापक चंद्रन,अॅड.सौ अनुराधा शानभाग,रमेश हलगेकर,राहूल घायताडे,चित्रकार पी.बी.तारु सर तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. पत्रकार अतुल देशपांडे यांनी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्रसंचालन डॉ. देवयानी मोघे व मानसी सदामते यांनी केले.
बहारदार शास्त्रीय भरतनाट्यम व गायन-वादनाच्या फ्युजनने महोत्सवाची सांगता ; जिल्हाधिकारी,धर्मादाय आयुक्त,पोलीस निरीक्षकांची नटराज मंदिरास भेट
RELATED ARTICLES