सातारा : सातारा शहराच्या पूर्वकडील सातारा कोरेगाव मर्गावर बॉम्बे रेस्टॉरंट चौकातील प्रसिद्ध आसणार्या नटराज मंदिराकडे जाणार्या मुख्य प्रवेशद्वारपासून ते मंदिरा पर्यतच्या रस्त्यावर किमान शंभर ते दोनशे लहान मोठे खड्डे पडले आहेत. रोज या मंदिरात शेकडो भक्त गण दर्शनासाठी जात असतात .सतत दिवसरात्र पडणार्या पावसामुळे तो रस्ता संपुर्ण खड्डेमय झाला आहे. त्यात सर्वच खड्ड्यामध्ये पाणी साचले असल्याने नागरिकांना वाहनचालकांना कसरत करत जावे लागत आहे. काही महिन्यांपूर्वी ग्रेट खडी टाकून भरुन घेतला होता परंतू सततच्या वर्दळीने पुन्हा जैसे थे अवस्था झाली आहे.
नागरिकांना पाऊल टाकताना विचार करुन टाकावा लागत आहे रस्ता निसरडा झाला आहे. तसेच एखादे चारचाकी वाहन जोरात गेले तर पाणी अंगावर उडते असे खूप प्रकार होत असतात. अनेक भकतांनमध्ये नाराजगी पसरली आहे. मंदिराच्या विश्वस्तानी खासदार उदयनराजे भोसले यांचेकडे मागणी करुन खासदार फंडातून हा संपूर्ण रस्ता व मंदिरा बाहेरील परिसर डांबरीकरन करून मिळावे असे अनेकदा मागणी केली होती. त्यावर खा. उदयनराजे भोसले यांनी हा रस्ता करुन देतो असा शब्द ही दिला होता. असंख्य नागरिकांनी हा रस्ता लवकरात लवकर करावा अशी विनवनी मंदिरांच्या विश्वस्तांना केली आहे..
( छाया संजय कारंडे )
नटराज मंदिराकडे जाणार्या रस्त्यावरील खड्डयांमुळे नागरिक हैराण
RELATED ARTICLES

