म्हासुर्णे ( प्रतिनिधी तुषार माने ) : म्हासुर्णे ता.खटाव येथे सालाबादप्रमाणे नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात सुरू झाला आहे.दरवर्षी प्रमाणे दररोज रात्री गावातील महिला एकत्र येवुन दांडीया खेळण्यासाठी येथे एकत्र येत असतात.दररोज वेगवेगळ्या पध्दतीने दांडीया खेळल्या जातात.मुले,मुली,महिला एकत्र मिळुन याठिकाणी दांडीया खेळल्या जातात.रात्री या मंडळाने वेशभुषा दांडीयाचे आयोजन केले होते.वेशभुषा दांडीया मध्ये वेगवेगळ्या वेशभुषा करुन गावातील महिला,मुले,मुली यांनी उत्फुर्त प्रतिसाद दर्शवला होता.अशा पध्दतीचे अनेक कार्यक्रम हे मंडळ राबवत असते हे सर्व कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी नवतरुण मंडळाचे अध्यक्ष संदिप माने,विठ्ठल माने,विठ्ठल यमगर,नामदेव माने,सचिन माने,मारुती औताडे परिश्रम घेतात.
म्हासुर्णेत नवरात्रोत्सवानिमित्त विविध कार्यक्रम
RELATED ARTICLES