मसूर : शेतक-यांचे हित लक्षात घेवून सहयाद्री साखर कारखान्याने उसाला रास्त भाव देताना दरासाठी धाडसी पाउल उचलल्यानेच राज्यातील साखर कारखान्यांना तीन हजाराच्या पुढे दर दयावा लागला असे स्पष्ट प्रतिपादन चेअरमन तथा आ.बाळासाहेब पाटील यांनी केले. तसेच जनहिताचे कोणतेही प्रश्न माहिती नसलेल्या आणि आजवर कोणताही ठोस विकास न केलेल्या केंद्र व राज्यातील सरकार साफ अपयशी ठरल्याचा आरोपही आ.पाटील यांनी केला.
कालगांव ता.कराड येथे नवनिर्वाचीत प.स.सदस्य ,सरपंच,उपसरपंच व सदस्यांचा सत्कार तसेच राष्ट्रवादीच्या जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी आ.पाटील बोलत होते.अध्यक्षस्थानी माजी सभापती देवराज पाटील होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सभापती शालन माळी,जि.प.सदस्य मानसिंगराव जगदाळै,प.स.सदस्य रमेश चव्हाण,संचालक लहुराज जाधव,माणिकराव पाटील,प्रांजली साळुंखे,तानाजी जाधव,भाउसाो चव्हाण,अशोकराव संकपाळ, बाळासाहेब जगदाळे,पै.संजय थोरात,जयवंत चव्हाण,प्रणव ताटे,भास्करराव गोरे,प्रमोद गायकवाड,लालासाहेब पाटील,सरपंच संगिता चव्हाण, उपसरपंच सुरेश चव्हाण यांची उपस्थिती होती.
आ.पाटील पुढे म्हणाले भाजप-सेनेत समन्वय नाही त्यांच्या श्रेयवादात विकास खुंटला असून प्रशासन खिळखिळे झाले आहे.शेतक-यांसाठीची फसवी कर्ज माफी सोयाबीन घरात पडून शेतीमालाला हमीभाव नाही,जी.एस.टी.ने व्यापा-यासह सामान्य जनता वैतागली,रस्त्यासाठी व शेती विजेसाठी निधी मिळत नाही.शिल्लक साखर असताना बाहेरून साखर आयात करणे,सहकाराविरोधी भूमीका घेणे अशा सर्वच पातळीवर या 3 वर्षात हुकूमशाहीचा कारभार करीत जनतेचा भ्रमनिरास केला आहे. आता तर 30 टक्के नोकर कपातीचा निर्णय घेवून बेरोजगार वाढीसाठी चालनाच मिळणार आहे त्यामुळे लाखो युवकांना नोेक-या देण्याची घोषणाही फसवी ठरली आहे. अशा लोकशाहीला घातक ठरत असलेल्या भाजपच्या भूलथापांना जनतेने बळी पडू नये असे अहवान करून केवळ निवडणूकीपुरते गावात येवून भ्रमनिरास करण्या-या प्रवृत्तीपासून जनतेने सावध रहावे,काहीजन राजकारणासाठी लोकांचा वापर करतात ही दुर्दैवी बाब आहे ,कमी मतांची सल लागल्याशिवाय कार्यकर्ता पेटून उठत नाही त्यामुळे पंचायत समितीच्या मतांची कमी कार्यकर्त्यांनी ग्रामपंचायत मध्ये भरून काढली .तेंव्हा नूतन पदाधिका-यांनी जनतेच्या विश्वासास तडा न जाता विकास प्रक्रिया राबवावी त्यांना सर्वोतोपरी सहकार्य करू अशी ग्वाही आ.पाटील यांनी दिली.
देवराज पाटील म्हणाले कार्यकत्यार्ंना ताकद व विकास देण्याचे काम आ.बाळासाहेब पाटील करीत असून चांगली माणस निवडून आली कि गावचा विकासही होतो.याचा प्रत्यय कालगांवच्या पदाधिका-यांनी दाखवून दयावा.
विकासाच्या बाबतीत भाजप पश्चिम महाराष्ट्रावर अन्याय करीत आहे. हे भूलथापांचे शासन जनताच खाली खेचेल,पदाधिका-यांनी निधीची चिंता करू नये त्यासाठी आमदार,जिल्हा परिषद व पंचायत समितीतून गावचा विकास होणार आहे जे सरकार शेतीला विज,रस्त्यावरचे डबरे भरत नाही ते कोणताच विकास करू शकत नाही.
यावेळी सौ.शालन माळी,कवठेचे सरपंच लालासाहेब पाटील,सरपंच सौ.संगीता चव्हाण,उपसरपंच सुरेश चव्हाण यांची भाषणे झाली.
प्रारंभी सरपंच,उपसरपंच ,ग्रामपंचायत सदस्य यांच्यासह सोसायटीचे चेअरमन सौ.वैशाली चव्हाण,कराड तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष सुधाकर चव्हाण,जयवंतराव चव्हाण,दिलीपराव चव्हाण,तंटामुक्तीचे अध्यक्ष सोमनाथ चव्हाण आदींचा सत्कार आ.पाटील यांच्या हस्ते झाला.
सूत्रसंचालन सुधाकर चव्हाण व अभिजीत चव्हाण यांनी केले तर आभार संतोष चव्हाण यांनी मानले.
आघाडी सरकारने सरसकट कर्जमाफी तात्काळ शेतक-यांच्या खात्यावर जमा केली.परंतु भाजप प्रणित सरकारने किचकट अटि लादल्या दिवाळीपूर्वी कर्ज माफी मिळेल अशी वल्गणा करणा-यांनी अद्याप कर्जमाफी दिली नाही. या उलट लाखो शेतक-यांना बोगस म्हणून हिनवले ही शेतक-यांची क्रूर चेष्टा आहे.मात्र हिवाळी अधिवेशनात विरोधक जाब विचारतील म्हणून काहींच्या खात्यावर पैसे जमा केले तथापी सर्व शेतक-यांना प्रत्यक्षात लाभ मिळेल कि नाही याबाबत अजूनही संभ्रमावस्था आहे अशी टिकाही आ.बाळासाहेब पाटील यांनी केली.
काही जण राजकीय चूल चालवण्यासाठी खाजगी कारखाने काढतात मात्र ते उस विकास कार्यक्रम व इतर सुविधा देत नाहीत .खाजगी कारखाने तात्पुरते आमिष दाखवतात.काटयाची गॅरंटी नसते त्यामुळे खाजगी कारखाने भविष्यात धोक्याची घंटा असून सहकारात मात्र फायदयाचे समान वाटप असते.खाजगीत तसे नसते.सहकारी तत्तवार चालणा-या सहयाद्रीने उस दरात धाडसी पाउल उचलल्यानेच राज्यातील कारखान्यांनाही दराबाबत विचार करावा लागला.सहयाद्रीच्या शेतकरी हिताच्या धोरणामुळेच उस उत्पादकांना दिलासा मिळाला असे स्पष्टोक्ती आ.बाळासाहेब पाटील यांनी विषद केली.