Friday, June 20, 2025
Homeठळक घडामोडीजीवनात शिक्षणाच्या मदतीने करिअर निवडताना जिद्द बाळगाः श्रृती अत्रे, न्यू इंग्लिश स्कूलचा वार्षिक...

जीवनात शिक्षणाच्या मदतीने करिअर निवडताना जिद्द बाळगाः श्रृती अत्रे, न्यू इंग्लिश स्कूलचा वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात संपन्न

साताराः जीवनात करिअर निवडताना प्रथम शिक्षण महत्वाचे आहे. देशाचे सुजाण नागरिक बनण्यासाठी आत्मविश्‍वास अंगी बाळगावा. कोणत्याही क्षेत्रात नाव मिळवण्यासाठी शिक्षणाला विसरू नका. मला या शालामाऊलीने स्टेज डेरींग, कॉन्फीडंन्स, जिंकण्याची उमेद दिली असे उदगार सुप्रसिध्द अभिनेत्री श्रृती अत्रे हिने काढले.
सातारा येथील डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या न्यू इंग्लिश स्कूलचा 97 वा वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा व स्नेहसंमेलन कार्यक्रमासाठी अभिनेत्री श्रृती अत्रे उपस्थित होती त्यावेळी त्यांनी वरील उदगार काढले. यावेळी शाळेच्या शालाप्रमुख सौ.स्नेहल कुलकर्णी,संमेलनाध्यक्षा सौ. सुजाता पाटील, उपाध्यक्षा सौ.शालिनी जाधव यांच्यासह पर्यवेक्षक श्री रावडे सर, सौ. लता दळवी, सौ.तिरमारे व विद्यार्थी प्रतिनिधी व विद्यार्थीनी प्रतिनिधींची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.
श्रृती अत्रे हिचे शाळेत आगमन झाल्यावर विविध प्राण्यांच्या मुखवटे व वेशभूषांनी शाळकरी मुलामुलींनी तिचे जोरदार स्वागत केले.
त्यानंतर इ.9 वी व 10 वीच्या शालेय मुलामुलींसोबत श्रृती अत्रे यांनी कलादालनात संवाद साधला. त्यावेळी विचारलेल्या अनेक प्रश्‍नांना हसतखेळत उत्तर देत श्रृतीने सर्वाची मने जिंकली. माजी विद्यार्थीनी म्हणून आज मला शाळेत प्रमुख पाहुणे म्हणून येताना खूप आनंद आणि अभिमान वाटत आहे. या शाळेने मला घडविण्यात मोठे योगदान दिले. आपण सर्वानी ध्येय निश्‍चित करून चांगल्या गुणांनी नाव मिळवावे. असे प्रतिपादन केले. या मुलाखतीचे आयोजन सौ. विनया कुलकर्णी व कल्याणकर यांनी केले होते.
वार्षिक पारितोषिक वितरण सोहळयाची सुरूवात प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सरस्वतीपुजन व दीपप्रज्वलनाने झाली. प्रास्ताविक विद्यार्थी प्रतिनिधी विवेक नाईक यानी केले. प्रमुख पाहुण्यांची ओळख जान्हवी देशपांडे यांनी करून दिली. कलाशिक्षक घनश्याम नवले यांनी श्रृतीचे काढलेले तात्काळ स्केच पेटिंग यावेळी श्रृती अत्रे यांना प्रदान करण्यात आले. पारितोषिक वितरण सोहळयात शाळेच्या विविध शैक्षणिक स्पर्धा, माध्यमिक शालांत, विविध विषय व वर्गात प्रथम आलेल्या सुमारे 45 मुलामुलींचा पारितोषिक वितरण सोहळा संपन्न झाला यावेळी उत्कृष्ट स्नेहसंमेलनाचे संयोजनाबद्दल शाळेच्या माजी शिक्षिका श्रीमती सुमन भिडे यांनी शालाप्रमुख सौ. स्नेहल कुलकर्णी यांचा विशेष सत्कार केला. शाळेच्या इ.9 वी व 10 वीच्या मुलामुलींनी सादर केलेल्या सुमारे 28 समूहनृत्ये, संस्कृत नाटिका, बालनाटय, एकपात्री आदी कार्यक्रमांना श्रृती अत्रे यांनी उपस्थिती दाखवून बालकलाकारांचा उत्साह वाढवला. हे सांस्कृतिक कार्यक्रम सुरू असतानाच प्रेक्षागृहापुढे कु. श्रेया प्रभूणे, पारस वंजारी व खूशी बैरागी यांनी आकर्षक चित्रे रेखाटली तर मंदार लोहार या बालशिल्पकाराने गणेशाची मुर्ती साकारली.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सौ. सोनाली महाडीक यांनी केले. तर आभार प्रदर्शन विद्यार्थी प्रतिनिधी केतन निबंधे व कु. खुशी वेळापूरे यांनी केले. कार्यक्रमास माजी मुख्याध्यापक आण्णा कंग्राळकर, वयोवृध्द कलाशिक्षक एस.व्ही.कुलकर्णी तसेच अनेक माजी शिक्षक शिक्षिकांनी या कार्यक्रमास उपस्थिती लावून शाळेस शुभेच्छा दिल्या. सर्व शाळकरी मुलांना आवडती आईसक्रीम देवून या रंगलेल्या दोन दिवसीय स्नेहसंमेलनाचा समारोप झाला.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular