Saturday, June 21, 2025
Homeठळक घडामोडीदरोडयाच्या तयारीत असणारे सहा संशयित जेरबंद

दरोडयाच्या तयारीत असणारे सहा संशयित जेरबंद

औंध : वडूज ते पुसेेसावळी रस्त्यावर पळशी ता.खटाव नजीक असणार्‍या पेट्रोल पंपाजवळ मंगळवारी पहाटे दोनच्या सुमारास दुचाकीवरून निघालेल्या सहा संशयितांना औंध पोलिसांनी अटक केली असून मागील चार दिवसांपूर्वी अंभेरी घाटात एकास लुटून मारहाण केल्याचे यामध्ये उघड झाले असून दरम्यान दरोडेखोरांची टोळी जेरबंद केल्याने औंधसह परिसरात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान पाच संशयित आरोपींना वडूज कोर्टाने तीन दिवस पोलीस कोठडी दिली आहे.
याबाबत औध पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, गोपूज, पळशीमार्गावर रात्रगस्त घालत असलेल्या औंध पोलीसांच्या पथकाला पळशी नजीक असणार्‍या एका पेट्रोलपंपानजीक तीन दुचाकी अंधारात उभ्या असलेल्या मंगळवारी पहाटे तीनच्या सुमारास आढळून आल्या. पोलीस आल्याची चाहूल लागताच दोन दुचाकी वरुन काही संशयित पळून गेले. मात्र एका काळया रंगाच्या एफ झेड नंबर नसल्याने दुचाकीवरील सुमित ऊर्फ गोविंद युवराज जाधव वय 20, रणजित महेंद्र जाधव वय 20 व एका 16वर्षीय अल्पवयीन संशयित आरोपी सर्व रा.इंदिरानगर वडूज ता.खटाव अशा तिघांना औंध पोलिसांनी पकडले. यावेळी सुमीतकडे एक लोखंडी कोयता, मिरची पूड रणजित जाधव याच्याकडे लोखंडी राँड आढळून आला त्यानंतर पळून गेलेल्या अन्य संशयित आरोपींना पकडण्यासाठी औंध पोलिसांनी नाकाबंदी केली असता नाकाबंदी मध्ये विना नंबरची लाल रंगाची प्लँटिना गाडी सापडली तसेच सागर विलास घाडगे वय 20 रा.फलटण, श्रीरंग मारुती जाधव वय 50, अरुण सदाशिव बोडरे वय 19 रा. वडूज ता.खटाव यांना पकडले. पकडलेल्या आरोपींमध्ये सागर घाडगे याच्याकडे मिरची पूड व लोखंडी रॉड तर अरुण बोडरे याच्याकडे लोखंडी
रॉड आढळला.तिसर्‍या दुचाकीवरून आकाश घाडगे रा.वडूज व वाठारचा पदया पूर्ण नाव माहीत नाही हे पळून गेल्याचे पकडलेल्या संशयित आरोपींनी सांगितले. यासर्व आरोपींनी पळशी ते पुसेसावळी मार्गावरील पळशीनजीकचा पेट्रोल पंप लुटण्याची पूर्व तयारी केली होती तसेच तिथून पुढे ते शामगाव घाटात ही जाणार होते अशी माहिती पोलिस तपासात पुढे आली आहे.
जिल्हा पोलीस अधिक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर पोलीस अधिक्षक धीरज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल वडनेरे यांच्या सहकार्याने सपोनि व्ही.डी.बडवे, पोलीस हवालदार प्रशांत पाटील, किरण जाधव, कुंडलिक कटरे, सी.डी.शिंदे, एस.एस.पोळ, पी.टी.यादव यांच्या पोलीस पथकाने ही कारवाई केली.
संशयित टोळीचे अनेक कारनामे उघड
पळशी ता.खटाव येथे पकडलेल्या संशयितांनी कोरेगाव, खटाव तालुक्यात अनेक गुन्हे केल्याचे उघड झाले असून कोरेगाव तालुक्यातील वाठार स्टेशन येथील टपरी जाळणे,रहिमतपूर पोलीस स्टेशनमध्ये अंभेरी घाटातील लूटमार करणे, वडूज पोलीस स्टेशनमध्ये घरफोडी केल्याचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत तसेच संबंधित टोळीने औंध, वडूज, पुसेगाव पोलीस स्टेशन कार्यक्षेत्रात तीस विद्युत मोटारी चोरल्याची माहिती समोर आली आहे तसेच दोन दुचाकी गाड्या ही चोरल्या आहेत.
दरम्यान शामगाव, अंभेरी, पवारवाडी, भावलिंग येथे ही लूटमारीच्या काही घटना या टोळीने केल्या असल्याचा संशय असून याबाबत संबंधित तक्रारदारांनी औंध पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular