Sunday, September 7, 2025
Homeठळक घडामोडीजिल्ह्यातील पाणी प्रश्‍नाला आघाडी सरकारच जबाबदार

जिल्ह्यातील पाणी प्रश्‍नाला आघाडी सरकारच जबाबदार

जिल्हयातील सात पाणी योजनासाठी 147 कोटी मंजुर, कामे मार्गी : ना. शेखर चरेगावकर
कराड : आघाडी सरकारने जिल्हयातील पाणी प्रश्‍न सोडविण्यासाठी प्रयत्न न करता जनतेला झुलवत ठेवले. तसेच त्यांची फसवणुक करून निव्वळ राजकारण केले आहे. मात्र गेल्या साडेचार वर्षात भाजप सरकारने जिल्हयातील पाणी प्रश्‍न सोडवण्याचा प्रयत्न केला आहे. राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांनी सात पाणी योजनांसाठी 147 कोटी रूपये मंजुर केले आहेत. त्यामुळे आज सात योजनांची कामे मार्गी लागली आहेत. अशी माहिती ना. शेखर चरेगावकर यंानी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी भाजपचे जिल्हाअध्यक्ष विक्रम पावसकर, उपाध्यक्ष रामकृष्ण वेताळ, युवानेते मनोज घोरपडे, घनश्याम पेंढारकर यंाच्यासह भाजपाचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
ना. चरेगावकर म्हणाले पाणी असुन ही जिल्हयातील काही तालुके, गावे यंाना आजपर्यंत पाणी मिळु शकले नाही.याला आघाडी सरकार व त्या सरकारमधील लोकप्रतिनीधी जबाबदार आहेत. भाजप सरकारने आपल्या कारकिर्दीत जिल्हयातील पिण्याचे व शेतीला लागणारे पाणी जनतेला देण्याचे आश्‍वासन दिले होते. ते जवळपास पुर्ण केले आहे. यात दुष्काळी भागाचाही समावेश आहे. सध्या जिल्हयातील सात योजनांसाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ना. चंद्रकांत दादा पाटील जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांनी 147 कोटी रूपयांचा निधी मंजुर केला. त्यामुळे दुष्काळी तालुके व त्यामधील पाणी न मिळणारी गावे सिंचनाखाली येणार आहेत. तसेच यापुढे पिण्याच्या पाण्याचाही प्रश्‍न तेथे भेडसवणार नाही. या सात योजनेमध्ये जीहे-कटापुर योजनेचा समावेश आहे.
सदरची योजना मंजुर होऊन येथे कामासही प्रारंभ झाला आहे. टेंबु उपसा जलसिंचन योजनेतुन मान खटाव तालुक्यातील 32 गावांना पाणी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच जिहे कटापुर योजनेतुन उत्तरमान तालुक्यातील 35 गावांना पाणी मिळणार आहे. उरमोडी कालव्याच्या बंदीस्त पाईपलाईन चे टेंडर काढण्यात आले आहे. मेरवेवाडी तलावात टेंबू योजनेचे पाणी सोडुन लगतच्या 16 गावांचा पाणी प्रश्‍न सोडवण्याची कार्यवाही झाली आहे. हणबरवाडी धनगरवाडी योजनेसाठी 26 कोटी 1 लक्ष मंजुर करण्यात आले आहेत. त्यामुळे तेथिल 35 गवांचा पाणी प्रश्‍न मार्गी लागला आहे. सोनापुर, अंतवडी, चोरे- चोरजवाडी, एम.आय.टँकचे टेंडंर काढण्यात येऊन तेथील कामे मार्गी लागली आहेत. म्हासुर्णे विभागातील डी. वाय. टु. पोटपाटाचे कामासाठी 4 कोटी 32 लाख रूपयांची तरतुद करण्यात येऊन तेथील कामे पुर्नत्वाकडे आली आहेत.
उरमोडी धरणातुन बंदीस्त पाईपलाईन केल्यांने बचत होणारे अतिरीक्त पाणी सातारा तालुक्यातील मांडवे तलावात सोडण्यात येणार आहे. त्यामुळे तेथील जवळपासच्या गावांचा पाणी प्रश्‍न सुटणार आहे. खटाव तालुक्यातील राजेचे कुर्ले येथील पाणीटंचाईसाठी तारळीच्या उजव्याकालव्याद्वारे पाणी देण्याची कार्यवाही झाली आहे. उरमोडी टप्पा क्र. 2 मध्ये नागझरीचा समावेश करण्यात आला आहे. टंेंबु योजनेतुन शामगावला पाणी पुरवठा करण्यात येणार आहे. त्यामुळे तेथील जवळपास 4000 हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. आटके ता. कराड येथील शेतातील पाण्याचा निचरा करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
जिल्हयातील राष्ट्रवादी, राष्ट्रीय काँगे्रसचे काही आजीमाजी आमदार भाजपच्या संपर्कात आहेत. थोडयाच कालावाधीत त्यांची नावे जाहिर होतील. तसेच जिल्हयातील भाजप शिवसेना व मित्रपक्षात कोणतेही मतभेद नाहीत. विधान सभेसाठी ज्यांना पक्षउमेद्वारी देईल त्यांचे काम एक दिलाने केले जाईल असे भाजप जिल्हाअध्यक्ष विक्रम पावसकर व ना. शेखर चरेगावकर यंानी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular