पूल वाहतुकीसाठी बंद असल्याने कोणतीही दुर्घटना घडली नाही
कराड : येथील कृष्णा नदीवरील ब्रिटीशकालीन जुना पुल आज दुपारी 3.30 च्या दरम्यान अचानक कोसळला. त्या पुलाच्या शेजारीच नव्या पुलाचे काम चालू असल्याने जुन्या पुलावरील वहातुक तेथेच असलेल्या पुलावरून काही दिवसापुर्वी वळविल्याने सुदैवाने कोणतीही दुर्घटना घडली नाही जुना पुल पडल्याची माहिती शहरात पसरताच पुलाशेजारी बघ्यांची मोठी गर्दी जमली होती तर काहीकाळ येथील पुलावरील वहातुकीस व्यत्यय निर्माण झाला होता.
कराड -विट्यावरून विजापुरकडे जाण्यासाठी गेल्या शतकापुर्वी ब्रिटीशांनी कृष्णा नदीवर दगडी बांधकामात पुल बांधला होता. या पुलावरून अनेक वेळा पावसाच्या पुराचे पाणी गेले होते. काही वर्षापुर्वी आलेल्या पुराणे या जुन्या कृष्णा पुलाचा एक पाय नादुरूस्त झाला होता. त्याची डागडुजीही करण्यात आली होती. तरीही या पुलावरून मोठया प्रमाणात वाहतुक चालु होती.
दरम्यान, केंद्रशासनाने चिपळुण विटा विजापुर या रस्त्याचे काम हाती घेतले आहे. या रस्त्याच्या अणुशंगानेच या कृष्णा नदीवर नव्याने पुलबांधणीचे काम हाती घेण्यात आले आहे त्याचे कामही सध्या चालु आहे.सध्या कृष्णानदीच्या तळातुन नव्या पुलाचे काही पाय उभारले गेले आहेत. अजुन काही पाय उभे करण्याचे काम चालु आहे. हे काम सध्या जुन्या पुलावरून करण्यात येत आहे. मात्र आज अचानक दुपारी 3.30 वाजता जुन्या पुलाचा मधला भाग नदी पात्रात कोसळला नसीब बलवंतर म्हणुन या पुलावरील वाहतुक वळवल्याने कोणतेही दुर्घटना घडली नाही.
कृष्णा नदीवरील नवीन पुल बांधण्याचे काम चालु असताना जुना पुल पाडण्यात येणार असल्याची माहिती मिळाल्यावरून येथील काही पत्रकार व सामाजिक संघटनानी जुना कृष्णापुल बचाव समितीची स्थापना करून जुना पुल पाडण्यात येवु नये अशी भुमिका घेवुन आंदोलन छेडण्याचा इशारा दिला होता. त्यावेळी रस्ते विकास महामंडळाच्या अधिकार्यंानी पुल बचाव समितीला पुल न पाडण्याचे आश्वासन दिले होते. असे असतानाच आज अचानक जुन्या पुलाचा मधला भाग कोसळला त्यामुळे पुलबचाव आंदोलनाला पुर्णविराम मिळाला. असे असले तरी पुल पडला, की पाडला? या चर्चेला शहरभर उधाण आले आहे.
कृष्णा नदीवरील जुना पुल कोसळला
RELATED ARTICLES