Saturday, June 21, 2025
Homeठळक घडामोडीदक्षिणमांड नदीत बेकायदेशीर वाळू उपसा

दक्षिणमांड नदीत बेकायदेशीर वाळू उपसा

स्थानिक ग्रामस्थ आवाज उठविण्याच्या तयारीत, जिल्हाधिकार्‍यंाना देणार निवेदन
कराड : प्रशासन लोकसभा निवडणुक व्यस्त असताना कालेसह झुंजारवाडी परिसरात वाळूमफियांनी उच्छाद मांडला असून बेकायदा उपसा केला जात आहे. याविरोधात स्थानिक ग्रामस्थ आवाज उठवण्याच्या तयारीत असून जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यंाना निवेदन देण्याच्या हालचाली काले, झुंजारवाडी ग्रामस्थांच्या सुरू आहेत.
काले, (झुंजारवाडी, ता. कराड) येथील दक्षिण मांडनदी नदी पात्रातुन गेल्या काही दिवसापासुन वाळू उपसा करणार्‍यांच्या हालचाली सुरू होतात बंधार्‍याच्या लगत नदीपात्रातुन रात्रीच्या वेळी मोठया प्रमाणात बेकायदा वाळु उपसा करण्यासाठी लागणारे साहित्य नदीपात्रालगतच ठेवलेले असते. त्याचा वापर करून रात्रभर वाळु उपसा केला जातो. वाळु उपशाचे प्रमाण वाढल्याने पर्यावरणाचा र्‍हास तर आहे शिवाय शेतकर्‍यांच्या विहिरीच पाणी पातळी खालावत असताना ऐन उन्हाळयात शेतीच्या पाण्याचा प्रश्‍न गंभीर होत आहे.
या विरोधात आवाज उठवण्यासाठी शेतकर्‍यंाच्या हालचाली सुरू आहेत. जिल्हाधिकारी, तहसीदार यांच्याकडे तक्रारी करण्याची कार्यवाही सुरू आहे. शासनाच्या महसुल बुडवुन वाळु माफियांनी अंधाराचा फायदा घेऊन दक्षिण मांड नदी पात्र अक्षरश: पोखरून काढले आहे. या खुलेआम वाळु उपशाला कोणाचे आशिर्वाद आहेत? असा सवाल केला जात आहे. संबंधित विभागाकडुन वाळु माफियांवर कारवाई होत नाही, त्यामुळे शेतकरी संतापले आहेत. वाळु चोरटयांना अभय का दिले जात आहे असा प्रश्‍नही शेतकरी उपस्थित करत आहेत.
हरित लवादने राज्यातील गौण खनिज उपशावर बंदी घातली आहे. त्यामुळे महसुल विभागाने वाळुची लिलाव काढलेले नाहीत त्यामुळे सर्वच ठिकाणचा वाळु उपसा पुर्णपणे बंद आहे. वाळू उपशावरील बंदीचा परिणाम बांधकाम क्षेत्रात झाला असुन वाळुच उपलब्ध होत नसल्याने वाळुचे दर गगनाला भिडले आहेत. वाळू उपशावर बंदी असल्याने बेकायदा वाळु उपसा करणार्‍या वाळु माफियांचे चांगलेच फावले आहे. वाळूला मागेल ती किंमत मिळत असुन झटपट पैसा कमावण्यासाठी वाळूमाफिया कडून नदीचे पात्र पोखरले जात आहे.
वाळूमाफियांनी दक्षिण मांड नदी पात्रात मोठा उच्छाद मांडला आहे. महसुल विभागाने वाळू माफिया वर कायदेशीर कारवाई करून कायमस्वरूपी त्यांच्या मुसक्या आवळाव्यात अशी येथील शेतकर्‍यांसह ग्रामस्थातुन मागणी होत आहे.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular