-संदीप मांडवे यांचे जिल्हाधिकार्यांना निवेदन
औंध : पावसाळा सुरू असून सुध्दा माण-खटाव मध्ये अत्यल्प पाऊस झाला आहे, पावसाने ओढ दिली असून खटाव तालुक्यात 75 टक्के पेरण्या झाल्या आहेत, मिळालेल्या माहितीनुसार उरमोडी धरणार साठ टक्के पाणीसाठा असून उपलब्ध पाणीसाठ्यातुन एक आवर्तन माण खटाव ला कॅनॉलद्वारे सोडण्यात यावे असे निवेदन खटाव पंचायत समितीचे माजी सभापती संदीप मांडवे यांनी शेतकर्यांना बरोबर घेऊन जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांना दिले आहे.
निवेदनात पुढे म्हटले आहे की,पेरणी झालेल्या गावांमध्ये कांदा, बटाटा, जवाटाणा, ऊस यासारखी प्रमुख भांडवली पीके घेतली आहेत,या पिकांवरच खटाव माणच्या शेतकर्यांचे आर्थिक बजेट अवलंबून असते, पावसाने ओढ दिल्यामुळे पिण्याबरोबर पिकांनाही पाण्याची खूप आवश्यकता आहे, अजून आठ दिवस पाण्याचे काही नियोजन झाले नाही तर शेतकर्यांना प्रचंड आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे, व खरीप वाया जाण्याची शक्यता आहे,त्यामुळे लवकरात लवकर उरमोडीतून पाणी सोडण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे.
उरमोडीतुन पिण्यासाठी व शेतीसाठी पाणी सोडा
RELATED ARTICLES