Tuesday, June 24, 2025
Homeताज्या घडामोडीनिवडणूक प्रशिक्षणास दांडी मारणार्‍यांना होणार शिक्षा

निवडणूक प्रशिक्षणास दांडी मारणार्‍यांना होणार शिक्षा

निवडणूक निरीक्षक रमाकांत झा यांचे आवाहन
कोरेगाव : लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील निवडणूक प्रशिक्षण वर्गास गैरहजर राहणार्‍या अधिकारी व कर्मचार्‍यांना आता शिक्षेला सामोरे जावे लागणार आहे. 21 एप्रिलपर्यंत सकाळी 10 ते सायंकाळी 6 यावेळेत त्यांना तहसील कार्यालयातील प्रशिक्षण वर्गास हजेरी लावावी लागणार आहे. याबाबत अधिकारी व कर्मचार्‍यांनी वेळ न दडवता त्वरित प्रशिक्षण पूर्ण करावे, असे आवाहन निवडणूक निरीक्षक रमाकांत झा यांनी केले.
कोरेगाव मतदारसंघातील मतदान अधिकारी व कर्मचार्‍यांच्या प्रशिक्षण वर्गास झा यांनी भेट दिली व गैरहजर असलेल्या अधिकारी व कर्मचार्‍यांची माहिती घेतली. याबाबत निवडणूक आयोगाच्या सूचनेप्रमाणे कारवाई करण्याबाबत त्यांनी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी कीर्ती नलावडे यांना सूचना दिल्या.
दि. 12 व 13 एप्रिल रोजी झालेल्या प्रशिक्षण वर्गास गैरहजर असलेल्या अधिकारी व कर्मचार्‍यांनी 21 एप्रिलपर्यंत तहसील कार्यालयात सुरु असलेल्या प्रशिक्षण वर्गास हजर राहणे अनिवार्य असून, तेथेच प्रमाणपत्र घेणे बंधनकारक असल्याचे झा यांनी स्पष्ट केले. प्रशिक्षणासाठी हजर असलेल्या अधिकारी व कर्मचार्‍यांनी ईडीसी व पीबीची पूर्तता करुन त्या सुविधा कक्षात जमा कराव्यात, अशा सूचना झा यांनी दिल्या.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular