Monday, June 23, 2025
Homeठळक घडामोडीजावलीचे लादलेले पार्सल जावलीला पाठवा

जावलीचे लादलेले पार्सल जावलीला पाठवा

उदयनराजे भोसले, महेश शिंदे यांच्या पदयात्रेत घुमला नारा
कोरेगाव : कोरेगाववर लादलेले जावलीचे पार्सल जावलीला परत पाठवा, मतदारसंघांचा भ्रमनिरास करणार्यां ना हद्दपार करा, अशा घोषणांनी कोरेगाव -खटाव मतदारसंघ दणाणून गेला. श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले व महेश शिंदे यांच्या प्रचारार्थ काढण्यात आलेल्या पदयात्रेत असा नारा घुमला.
सातारा लोकसभा पोटनिवडणुकीतील भाजप व मित्र पक्षाचे उमेदवार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले व कोरेगाव – खटाव विधानसभा मतदार संघाचे शिवसेना व मित्र पक्षाचे उमेदवार महेश शिंदे यांच्या प्रचारार्थ कोरेगाव खटाव मतदारसंघात विविध ठिकाणी पदयात्रा व गावभेटींचे आयोजन करण्यात आले होते. महेश शिंदे यांच्या खटाव गावात जोरदार शक्तिप्रदर्शन करत उदयनराजे भोसले महेश शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत पदयात्रा काढण्यात आली. यावेळी शिवसेनेचे नेते नितीन बानूगडे पाटील, सुनिल खत्री, ऍड नितीन भोसले, समृद्धी जाधव, प्रताप जाधव, सरपंच नंदकुमार वायदंडे , उपसरपंच अमर देशमुख, राहुल पाटील, अमीन आगा, महेश काळे आदी उपस्थित होते.
यावेळी झालेल्या कोपरा सभेत उदयनराजे यांनी शशिकांत शिंदे यांच्या कार्यपद्धतीवर जोरदार टीका करत महेश शिंदे यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन केले.
खटावनंतर पुसेगाव येथेही काढण्यात आलेल्या पदयात्रेला चांगला प्रतिसाद मिळाला. बुध, डिस्कळ, शिंदेवाडी, ललगुण, किन्हई, खेड आदी ठिकाणी काढण्यात आलेल्या पदयात्राना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.त्याचप्रमाणे अंबवडे संमत कोरेगाव, बर्गेवाडी, भाडळे, शिवथर आदी ठिकाणी उदयनराजे भोसले आणि महेश शिंदे यांचे उत्साही स्वागत करण्यात आले. मतदारसंघात काढण्यात आलेल्या पडयात्रा मध्ये जावळीचे पार्सल जावळीला पाठवा, अशा घोषणा देण्यात येत होत्या.
पुसेगाव येथील पदयात्रेमध्ये गावच्या सरपंच सौ. गोरे, उपसरपंच रणधीर जाधव, भरत मुळे, दिपाली मुळे, अंकुशराव जाधव, रोहन जाधव आदी सहभागी झाले होते.खेड येथील पदयात्रेमध्ये उत्तम बापू कदम, सरपंच संदीप कदम, भाजप उपाध्यक्ष शरद कदम, सोसायटीचे चेअरमन मदन कदम, भाजप, शिवसेना व मित्र पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular