Monday, June 23, 2025
Homeठळक घडामोडीपोहण्याच्या तलावात पडलेल्या भेकारास जीवदान

पोहण्याच्या तलावात पडलेल्या भेकारास जीवदान

वनखात्याच्या मदतीने भेकारास पुन्हा सुखरूप जंगलात सोडाले
महाबळेश्वर : सध्या सर्वत्र कडक उन्हाळा सुरु असल्याने वन्य प्राणी पाण्याच्या व भक्षाच्या शोधात मानवी वस्तीत घुसून लपून बसल्याचे अनेक वेळा आपण ऐकतो, वाचतो .त्यात त्याचा मृत्यू हि झाल्याच्या अनेक घटना आढळतात. असाच काहीसा प्रकार आज महाबळेश्वर येथील हॉटेल नीता मध्ये पहावयास मिळाला.
आज दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास एक रस्ता चुकलेले व घाबरलेले भेकराचे (हरणाचे ) पिल्लू या हॉटेल मध्ये घुसले व पळापळी करीत असताना याच हॉटेलच्या पोहण्याच्या तलावात पडले. नीता हॉटेलचे व्यवस्थापक दत्ता वाडकर व त्यांचे सहकारी विठ्ठलभाई भानुशाली, संजय जांभळे, शानवाज खारकंडे,अनिकेत रिंगे, भगवान आखाडे यांना ते दिसताच त्यांनी तातडीने येथील वनखात्यास काळवून सदरच्या घटनेची माहिती महाबळेश्वर चे वनक्षेत्रपाल आर. आर. गायकवाड यांना दिली .विषयाचे गांभीर्य ओळखून वनाधिकारी गायकवाड त्यांचे सहकारी वनरक्षक महाबळेश्वर डी.बी. सोरट, एल. डी. राउत (वनरक्षक तळदेव ), के. एच. खराडे (वनरक्षक मेटतळे), वन कर्मचारी ए. डी. कात्रट, ए. एम. जुंद्रे, वागदरे आदी वनखात्याचे पथक घटनास्थळी रवाना झाले .त्यांनी भेकराच्या पिल्लाला हॉटेल व्यवस्थापक, वनकर्मचारी व अन्य हॉटेल स्टाफ च्या मदतीने पिंजर्‍याच्या सहाय्याने तलावा बाहेर काढले. तातडीने पशु वैद्यकीय अधिकार्‍या कडून त्याची तपासणी केली असता भेकाराचे पिल्लू सुस्थितीत असल्याचे त्यांना आढळून आले त्याला कोठेही जखम नव्हती मात्र ते अत्यंत घाबरलेल्या आवस्थेत होते .वनखात्याने त्याची नंतर पाहणी केली असता सदर भेकर नर जातीचे असून ते 3 वर्षाचे असावे असा अंदाज असून त्याची पूर्ण तपासणी केल्या नंतर व ते सुस्थितीत असल्याची खात्री झाल्या नंतर सदर भेकारास त्याच्या अधिवासात सुरक्षित जंगलात सोडण्यात आले .
दरम्यान वन्य प्राणी प्रेमी, सामाजिक कार्यकर्ते व नीता हॉटेलचे व्यवस्थापक दत्ता वाडकर व त्यांचे सहकार्‍यांनी दाखविलेल्या तत्परतेमुळे एका वन्य प्राण्याचा प्राण वाचला व त्याला पुन्हा जंगलात त्याचे घर मिळाले अन्यथा हि गोष्ट फार वेळ लक्षात आली नसती तर घाबरलेल्या मुक्या जीवाला पाण्यात बुडून आपल्या प्राणास मुकावे लागले असते. एका वन्य प्राण्याचा प्राण वाचविल्या बद्धल व दाखविलेल्या तत्परते बद्धल दत्ता वाडकर व त्याचे सहकारी यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular