टाकेवाडी आदर्श गावाला ग्रामस्थांनी दिली भेट
म्हसवड : वॉटर कप 2019 च्या माध्यमातून गोंदवले खुर्द गाव पाणीदार करण्यासाठी ग्रामस्थांनी कंबर कसली असून काल धुलीवंदनाच्या दिवशी सण साजरा करायच्या आगोदर महाराष्ट्रात पहिला नंबर मिळवलेल्या टाकेवाडी गावाला भेट देत दिवसभर तिथल्या कामाची आणि गावाची पाहणी करून आपण त्याच पध्दतीने काम करण्याचा निर्धार केला असून कामाला प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे.
काल सर्वत्र होळी आणि धुलीवंदन सण साजरा करण्यात आला. मात्र गोंदवलेकर ग्रामस्थ यांनी मात्र ह्या सणाच्या ऐवजी सहभाग घेतलेल्या वॉटर कप कामासाठी वेळ घालवला. काल धुलिवंदन दिवशी सर्व गोंदवले ग्रामस्थांनी एकत्र जमत महाराष्ट्रात वॉटर कप मध्ये पहिला क्रमांक पटकावलेल्या माण तालुक्यातील टाकेवाडी या गावाला जाण्याचा बेत आखला नुसती कल्पना सांगे पर्यत सुमारे शंभर युवक जेष्ठ नागरिक चुटकी सरशी तयार झाले. दुपारी 12 वाजता सर्व जण टाकेवाडीला पोहचले तिथं गेल्यावर आपण माण तालुक्यात नसून कुठं तरी बाहेर आहोत असे वाटायला लागलं. गावच प्रवेशद्वार आणि त्यां ग्रामस्थांनी तिथून वॉटर कपमध्ये केलेल्या कामाची माहिती फलक लावले असून कोणत्या ठिकाणी काय काय कामे केली आहेत ती कामे किती घन मीटर आसून त्यात पडलेल्या पावसाचे किती पाणी आडणार त्यांची संख्या किती आहे अशी अतिशय तंत्र शुध्द माहिती फलका द्वारे लावण्यात आली आहे त्यामुळे गावात केलेल्या कामाचा सारांश त्यातून आलेल्या लोकांना पाहायला मिळतो. अशा नीटनेटक्या नियोजनाचा या गावाला फायदा झाला आहे.
गावाने केलेल्या माती बांध, कंपार्टमेंट बंडीग, सलग समतल चर, तीव्र उतारावर माथा ते पायथा केलेली कामे अतिशय उत्कृष्ट असून वृक्ष संवर्धन व त्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न नाडेफ मधून केलेली कामे, आगपेटी विरहित शिवार, वाहून जाणार्या पाण्यावर तयार केलेल्या परस बाग, शोष खड्डे या बरोबर शिवार ना शिवार फिरून केलेली कामे काल सर्व गोंदवलेकर ग्रामस्थांनी पाहिली आणि तिथल्या सरपंच आणि ग्रामस्थांशी या कामाबद्दल खूप चर्चा केली व ही स्पर्धा सातत्य राखून काम केले तर सोपी असून कोणीही आपल्या मनात कुठली ही शंका आणायची नाही आपण स्पर्धा जिंकरणारच असा निर्धार करत टाकेवाडी कारांचा निरोप घेतला.
गोंदवले खुर्द गाव पाणीदार करण्यासाठी ग्रामस्थांनी कंबर कसली
RELATED ARTICLES