Tuesday, June 24, 2025
Homeठळक घडामोडीअल्पवयीन मुलीवर नराधमाकडून बलात्कार

अल्पवयीन मुलीवर नराधमाकडून बलात्कार

म्हसवड : माण तालुक्यात माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली असून, इयत्ता पाचवी मध्ये शिकत असलेल्या अल्पवयीन मुलीवर एका नराधमाने मोटरसायकलवर लिप्ट देऊन ओसाड माळरानात नेहून जबरी संभोग केला असून, या घटनेची नोंद पोलीस ठाण्यात करण्यात आली असून या घटनेमुळे माण तालुक्यात खळबळ उडाली आहे.
याबाबत पोलीस ठाण्यातून मिळालेली माहिती पुढील प्रमाणे पिडित मुलगी ही इयत्ता पाचवीच्या वर्गात शिकत असून वय वर्षे 10 आहे. तर तिची लहान बहिण वय 8 ही इयत्ता 3 री मध्ये जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकत आहे. तर 6 वर्षाचा भाऊ 1 पहिलीच्या वर्गात शिकत आहे.
1 जुलै रोजी तिन्ही बहिण भाऊ नेहमी प्रमाणे सकाळी शाळेत आली मोठ्या बहिणीने लहान बहिण व भाऊ यास जिल्हा परिषदेच्या शाळेत सोडून स्वता हायस्कूल मध्ये शाळेत गेली. दिवसभर शाळेत शिक्षण घेऊन सायंकाळी 5:30 वाजता शाळा सुटल्यानंतर पिडित मुलगी लहान बहिण व भाऊ यास घेऊन शाळेपासून 4 किमी अंतरावर असलेल्या घरी जाण्यासाठी चालत निघाले होते. दिवसभर अधून मधून पावसाची रिपरिप असल्याने रस्त्याने चालत असताना रस्त्याने जाणार्‍या मोटरसायकल या वाहनाना मुलं हात करून लिप्ट मागत होती.
या वेळी एका नराधमाने काळ्या रंगाची असलेली मोटरसायकल थांबवली व तिन्ही मुलांना गाडीवर बसवून सदर रस्त्याने घराच्या दिशेने निघाला होता. मात्र घर जवळ आल्यानंतर गाडी उभी न करता एका गावच्या ओसाड माळरानत असलेल्या मंदिरा जवळ गाडी थांबवली व दोघांना गाडी जवळ थांबवले व पिडित मुलीस लांब असलेल्या झाडाकडे घेऊन जात होता. त्यावेळी लहान असलेला भाऊ तिकडे गेला असता नराधमाने त्यांच्या गालफाडात चापट मारली व तो पुढे गेला पिडित मुलीवर जबरी संभोग केला. व ही बाब कुणाला सांगितली तर जिवे मारण्याची धमकी मुलीस देऊन मुलांना परत घरापासून काही अंतरावर सोडून पलायन केले.
माण तालुक्यात भिषण दुष्काळी परिस्थिती असल्याने पिडित मुलीचे आई वडील हे योजनांवर कामाला गेले होते.ते घरी आल्यावर त्यांना मुलीनी घडलेली हकिकत सांगितली असता वडिलांनी या बाबत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
या घटनेची माहिती समजताच उपविभागीय पोलीस अधिकारी नवनाथ ढवळे यांनी घटनास्थळी भेट दिली असून या बाबतचा तपास सपोनि एम. बी. देशमुख करत आहेत.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular