Monday, June 23, 2025
Homeठळक घडामोडीमहिलेच्या गळ्यातील सोन्याचे गंठन धुमस्टाईलने चोरणार्‍या दोघांना अटक

महिलेच्या गळ्यातील सोन्याचे गंठन धुमस्टाईलने चोरणार्‍या दोघांना अटक

म्हसवड : खटाव तालुक्यातील कातरखटाव येथे नातेवाईकाच्या लग्नाल आलेल्या महिलेच्या गळ्यातील पाच तोळे सोन्याचे गंठन हिसका देऊन पल्सर गाडीवरून धुमस्टाईलने पोबारा केलेल्या दोन सराईत चोरट्यांना म्हसवड हद्दीतील धुळदेवच्या माळात म्हसवड पोलीस ठाण्याचे सपोनि मालोजीराजे देशमुख व कर्मचार्यांनी सुमारे वीस किलोमिटर फिल्मीस्टाईल पाठलाग करून जेरबंद केल्याने म्हसवड पोलीसांचे कौतुक केले जात आहे.
याबाबत म्हसवड पोलीस ठाण्यातून उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल वडनेरे यांनी दिलेली माहिती पुढील प्रमाणे शनिवार 13 रोजी डांबेवाडी ता.खटाव येथील महिला मनिषा सदाशिव बागल वय 52 ह्या कातरखटाव ता.खटाव येथे नातेवाईकाच्या लग्नाला आल्या होत्या. दुपारी 12 च्या सुमारास कात्रेश्वर मंदिरा जवळ दर्शन करून रस्त्याने चालत असताना काळ्या रंगाच्या पल्सर या दुचाकीवरून आलेल्या दोन युवकांनी त्यांच्या गळ्यात असलेले पाच तोळ्याचे सोन्याचे गंठन व लहान मंगळसुत्र हिसका देऊन पोबारा केला असता त्यातील मंगळसुत्र व गंठनात असलेले पदक खाली पडले व चोरट्यांनी गंठन घेऊन पलायन केले असता महिलेने आरडाओरडा केला असता नातेवाईकानी तातडीने उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल वडनेरे यांचेशी संपर्क करून घडलेल्या घटनेची माहिती दिली असता वडनेरे यांनी तत्परतेने म्हसवड, दहिवडी, वडूज, आदि पोलीस ठाण्यात माहिती देऊन नाकाबंदी करण्याचे आदेश दिले होते.
या वेळी म्हसवड पोलीस ठाण्याचे सपोनि मालोजीराजे देशमुख व कर्मचार्यानी तपास कामी तातडीने हलचाली करून पोलीस गाडी मायणीच्या दिशेनी तपास करण्यास सुरुवात केली असता वडजल हद्दीत पल्सर मोटरसायकल वरून दोघेजन धुमस्टाईलने गाडीवरून म्हसवड च्या दिशेने जात असल्याचे पोलीस हवलदार बी.एन.जाधव यांनी पाहिले व लगेचच त्यांनी त्या चोरट्यांचा
पाठलाग सुरू केला. चोरटे भरधाव वेगाने गाडी चालवत होते.त्यांनी ढाकणी, दिवड, म्हसवड हे अंतर काही मिनिटातच पार केले पोलिस गाडीचे ड्रायव्हर धनाजी शिंदे यांनी आपल्या ड्रायव्हिंगची लकब दाखवत भरधाव वेगाने पाठलाग सुरू केला होता.हा जीवघेणा पाटलाग सुरू असताना म्हसवड पासून चार किलोमीटर अंतरावर असलेल्या धुळदेव या गावाजवळ चोरटे पंढरपूर वरून वारकरी वारी करून परतीच्या वाटेवर असल्याने त्यांच्या गाड्यांची वर्दल रस्त्याने खुप होती.व रस्त्याचे काम ही सुरूअसल्याने चोरट्यांना वाहतुकीच्या कोंडीमुळे अडचणीचे झाल्याने पल्सर गाडी रस्त्यात टाकून पळ काढू लागले त्यांनी माळा माळानी पळायला सुरूवात केली असता सपोनि मालोजीराव देशमुख, पोलिस हवलदार धनाजी शिंदे, श्रीनिवास सानप, यांनी त्यांच्या पाठलाग सुरू केला हा पाठलाग एक किलोमीटर चालला होता.या वेळी समयसुचकता दाखवत पोलिस हवलदार बी.एन.जाधव यांनी रस्त्याने येणार्या मोटरसायकल स्वारांना चोरट्या बाबत माहिती दिली असता अनेक जण चोरट्यांचा पाटलाग सुरू केला. या वेळी सपोनि मालोजीराव देशमुख व पोलिस हवलदार धनाजी शिंदे यांनी दोघांनाही पकडले व सर्वांचा जीव भांड्यात पडला.
यानंतर दोघा आरोपीना म्हसवड पोलिस ठाण्यात हजर करण्यात आले या वेळी उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल वडनेरे ही आले, अधिक तपास केला असता कबरअली सरताजअल्ली इराणी वय 30 रा रा. जयसिंगपूर ता शिरोळा जि.कोल्हापूर व शफीर शिराज इराणी वय 30रा.सांगली रेल्वेस्टेशन जवळ अशी नावे सांगितल्या नंतर त्यांनी सांगली वरून आल्याचे सांगितले व त्यांची झडती घेतली असता त्याच्या कडे कातरखटाव येथून महिलेच्या गळ्यातून चोरून आणलेलंपाच, तोळ्याचे गंठन सुमारे 1लाख 65हजार रूपये,90हजार रूपये किमतीची बजाज पल्सर दुचाकी, व रोख रक्कम 7हजार 500रूपये दोन मोबाईल फोन, एटीएम कार्ड, गांज्या ओढायची चिलिम मिळून आली.
या आरोपी मधील कबरअली इराणी यांच्यावर नेरळ नवीमुबई या ठिकाणी 15गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसानी दिली आहे. या कारवाई मध्ये सपोनि मालोजीराव देशमुख यांचे सह बी.एन.जाधव, अनिल शिंदे, श्रीनिवास सानप, संतोष फडतरे संतोष संतोष बागल, नितिन धुमाळ, अभिजीत भादुले, संतोष काळे, राजेंद घाडगे, कांबळे, कुर्‍हाडे सहभागी होते.
दोन्ही आरोपी यांना वडूज पोलिस ठाण्यात दाखल केले असता त्याच्या वर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular