Wednesday, June 25, 2025
Homeताज्या घडामोडीमाणमध्ये वीज अंगावर पडून म्हैस ठार

माणमध्ये वीज अंगावर पडून म्हैस ठार

म्हसवड : गंगोती, ता. माण येथील शेतकरी ईश्वरा राणाप्पा झिमल यांची घरासमोर दावणीला बांधलेली साठ हजार रूपये किमतीची म्हैस अंगावर वीज कोसळुन मृत झाली आहे.
माण तालुक्यात काल पासून वादली वार्‍यासह ढगांचा गडगडाट व वीजांचा कडकडाट सुरू आहे. गंगोती, ता.माण येथील शेतकरी यांनी दुष्काळी परिस्थितीतही पोटाला चिमटे काढून पशुधन वाचवण्यासाठी प्रयत्न करत होते. ते दुष्काळातही पाच जनावर पोटच्या पोरासारखी सांभाळत होते.
काल दिवसभर जनावरं रानातून फिरवून आणून ढगांचा गडगडाट व वीजांचा कडकडाट होत असल्यामुळे लवकर घरी आणून दावणीला बांधलेली होती.सायंकाळी 7:30 च्या सुमारास गंगोती परिसरात वीजेचा कडकडाट सुरू होता. अचानक झिमल यांच्या घरासमोर बांधलेल्या पाच जनावरांपैकी म्हैसीच्या अंगावर वीज कोसळल्याने म्हैस मृत झाल्याने संबंधित शेतकर्‍यावर दुष्काळात मोठं संकट उभे राहिले आहे. सदर घटनेचा पंचनामा गावकामगार तलाटी सुरेश बदडे, पशुवैद्यकिय डॉ. तारळेकर, पोलिस पाटील वैशाली राहुल झिमल यांनी केला असून याबाबत संबंधित शेतकर्यास नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी होत आहे.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular