म्हसवड : म्हसवड – मायणी रस्त्यावर दिवड बस थांब्याजवळ बोलेरो गाडी व दुचाकी यांची समोरासमोर धडक झाली. यामध्ये दुचाकीवरील दोन जण ठार झाला तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली.
याबाबत अधिक माहिती अशी बोलेरो गाडी क्रमांक एम एच -ए जि – 2293 ही गाडी तुळजापूरहून दर्शन घेऊन आपल्या धोंडेवाडी ता.खटाव जि सातारा या गावी निघाले होते. बोलेरो गाडी दिवड बस थांब्याच्या थोडे पुढे गेल्यानंतर समोरून येणार्या बजाज डिस्कव्हर गाडी क्रमांक चक-10/-ढ 2487 या दुचाकींचा व बोलेरो गाडीची धडक झाली.ही धडक एव्हढी जोरात झाली की यामध्ये दुचाकीचे पुढील चाक मोडून पडले,हेड लाईट तुटून पडली, तर बोलेरो गाडीचा बंपर रॉड वाकला होता.व गाडीची पुढील काच फुटून बाजूला पडली होती. या दोन गाड्यांची धडक झाल्यानंतर दुचाकी मोडून बाजूला पडली होती.
या धडकेमध्ये दुचाकी वरील कुंडलिक दादासो जानकर वय 28 वर्षे रा.भेंडवडे ता. खानापूर जि सांगली हा मयत झाला तर शशिकांत शिवाजी जानकर वय 30 वर्षे रा.भेंडवडे ता.खानापूर जि सांगली हा गंभीर जखमी झाला, त्यास अधिक उपचारासाठी अकलूज येथे नेले असता उपचारा दरम्यान मृत्यू झाला. सदर घटनेचा तपास सपोनि देशमुख हे करीत आहेत.
बोलेरो व दुचाकीच्या धडकेत दोन जण ठार
RELATED ARTICLES