म्हसवड : देवापुर, ता. माण येथील विवाहित महिलेवर सराईत गुंड दादा उर्फ हणमंत खंडू जाधव या लिंगपिसाट प्रवृत्तीच्या नराधमाने जबरदस्तीने संभोग व अॅट्रसिटी या गुन्हात आठ महिने जेलमध्ये राहून नुकताच जामिनावर सुटून आल्यानंतर चार दिवसात पुन्हा पीडित महिला माहित असूनही वारंवार त्रास देणं, पाटलाग करणे, मोबाईल फोन मधील व्हॉटसपवर मेसेज केल्याच्या कारणावरून पीडित महिलेने म्हसवड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलिसांनी आरोपीस अटक केली आहे.
याबाबत पोलिस ठाण्यातून मिळालेली अधिक माहित अशी 29 एप्रिल ते 9 मे रोजी रात्री अपरात्री 7796519722 या मोबाईल नंबर वरून पीडित महिलेच्या मोबाईल फोन मधील व्हॉटसपवर आरोपी दादा उर्फ हणमंत खंडू जाधव यांनी देवापुर, ता.माण याने मेसेज पाटवून मी तुझ्या शिवाय राहू शकत नाही. मी जेलमध्ये आठ महिने राहून आलो तरीही माझे तुझ्यासाठी प्रेम कमी झाले नाही. यासह अनेक मेसेज केले असून, सतत फोन कॉल्स करणे, व्हिडिओ कॉल्स करत होता.परंतू सदर पीडित महिलेने त्याचा कुठलाही कॉल रिसिव्ह केला नाही. व त्याने केलेल्या प्रत्येक मेसेज कडे दुर्लक्ष केले. तरीही आरोपी मेसेज करतच आहे.
तसेच सदर महिला तिच्या दोन मुलांना म्हसवड मध्ये अॅबॅकसच्या क्लास साठी घेऊन येत होती. त्यावेळी तो पाठलाग करुन तो मला वारंवार त्रास देत असतो.
सदर आरोपी दादा उर्फ हणमंत खंडू जाधव याच्या पासून पिडित महिलेला व तिच्या कुटुबाला धोका आहे. असे फिर्यादीत म्हटले असून या गुन्हाचा तपास डीवायएसपी अनिल वडनेरे करत असून, त्यांनी आज देवापुर येथील फिर्यादी यांच्या घरी जाऊन भेट दिली. तर सपोनि मालोजीराव देशमुख यांनी वडूज येथे सापळा रचून आरोपी दादा उर्फ हणमंत खंडू जाधव यास अटक केली आहे. असून पुढील तपास डीवायएसपी अनिल वडनेरे करत आहेत.
विवाहित महिलेला त्रास देणार्या नराधमास अटक
RELATED ARTICLES

