Thursday, June 19, 2025
Homeठळक घडामोडीचारा छावणीमध्ये मुक्कामास असणार्‍या शेतकर्‍याना गोदरेज कंपनीच्या फ़ंडातून सोलर दिव्यांचे वाटप

चारा छावणीमध्ये मुक्कामास असणार्‍या शेतकर्‍याना गोदरेज कंपनीच्या फ़ंडातून सोलर दिव्यांचे वाटप

म्हसवड : माण देशी फौंडेशन व बजाज ऑटो यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या जनावरांच्या चारा छावणीमध्ये जनावरांना चांगल्या प्रतीचा चारा देण्याबरोबर छावणीत असणार्‍या शेतकर्‍यांची सुद्धा चांगल्या प्रकारे काळजी घेतली जाते याचाच एक भाग म्हणजे छावणीमध्ये मुक्कामास असणार्‍या शेतकर्‍याना गोदरेज कंपनीच्या फ़ंडातून सोलर दिव्यांचे वाटप करण्यात येत असल्याचे विजय सिन्हा यांनी सांगितले.
म्हसवड येथे माण देशी फौंडेशन व बजाज यांच्या संयुक्त विद्यमाने जनावरांची चारा छावणी सुरू असून या छावणीमध्ये जनावरांची काळजी घेण्यासाठी मुक्कामास असणार्‍या शेतकर्‍याना गोदरेज कंपनिकडून सोलर दिव्याचे वाटप करण्यात आले यावेळी विजय सिन्हा बोलत होते.यावेळी माण देशी फौंडेशनच्या अध्यक्षा श्रीमती चेतना सिन्हा, अजित व्होरा, गजुभाई व्होरा, रुपेश व्होरा, धवल व्होराआदी उपस्थित होते.
यावेळी विजय सिन्हा म्हणाले म्हसवड येथे माण देशी फौंडेशन व बजाज यांच्या संयुक्त विद्यमाने जनावरांची चारा छावणी सुरू असून 1 जानेवारी रोजी सुरू झालेल्या या छावणीमध्ये 8 हजार जनावरे आहेत.छावणीत असणार्‍या जनावरांना चांगल्या प्रतीचा चारा तसेच पेंड दिली जाते शिवाय पाण्याचीही कमतरता पडू दिली जात नाही.हे करीत असताना कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सर्व प्रकारच्या दक्षता घेतल्या जातात.वेगात वाहने चालवू नयेत यासाठी ठिकठिकाणी वेगप्रतिबंधक बसविले आहेत.अनावधानाने आग लागली तर ती पसरू नये या साठी आग नियंत्रक बसवण्यात आले आहेत शिवाय पाण्याने भरलेला टँकर सज्ज ठेवला जातो तसेच त्या टँकरचा चालकही सज्ज ठेवला जातो..
या छावणीमध्ये जवळपास 800 शेतकरी जनावरांची काळजी घेण्यासाठी झोपडया बांधून मुक्कामास असतात.संध्याकाळच्या वेळेस या झोपड्यांमध्ये प्रकाशाची गरज असते.तसेच नातेवाईकांशी संपर्क साधण्यासाठी त्यांच्याकडे असणार्‍या मोबाईल चार्जिंगची गरज ओळखून गोदरेज कंपनीचे म्हसवड येथील गजुभाई व्होरा व अजित व्होरा यांनी गोदरेज कंपनीशी संपर्क साधून सोलर लॅम्प उपलब्ध करून दिले आहेत.ज्यामुळे छावणीमधील झोपड्यांचा रात्रीच्यावेळी प्रकाशाचा प्रश्न सुटला आहे.शिवाय माळरानावर साप,विंचू यापासूनही सुरक्षितता मिळणार आहे.
यावेळी चेतना सिन्हा म्हणाल्या गोदरेज कंपनीकडून छावणीतील मुक्कामी असणार्‍या शेतकर्‍यानं सोलर दिवे व सोलरवर चालणारी कडबाकुट्टी मशीन देण्यात येणार आहे.परंतु दिवसभर काबाडकष्ट करणार्‍या या शेतकऱयांच्या घरातील ज्या महिलांच्या नावावर छावणीमध्ये नोंद आहे अश्या महिलांना प्रथम प्राधान्याने या सुविधा देण्यात येणार आहेत .असे सांगून त्या पुढे म्हणाल्या घरामध्ये दिवसभर काबाडकष्ट करणार्‍या या महिलांच्या नावावर दूध विकुन येणारे पैसे जमा करावेत.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन छावणीचे व्यवस्थापक रवींद्र वीरकर यांनी केले

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular