म्हसवड : दुष्काळी असणारा कलंक पुसून गाव पाणीदार करण्यासाठी गोंदवले खुर्दने आज श्रमदानाचा उचांक करत वॉटर कप जिंकायचाच या निर्धाराने भल्या सकाळी सुमारे 1400 ग्रामस्थ युवक आणि महिलांनी श्रमदानात सहभाग घेऊन पाणी आडवण्याच्या दृष्टीने जोरदार पणे कामाला सुरुवात केली
यावर्षी 8 एप्रिल या दिवशी वॉटर कप स्पर्धेला सुरूवात झाली असून सलग 45 दिवस ही स्पर्धा चालणार आहे.आज सोमवार बरोबर पहाटे 5 वाजता सगळा गाव जागा झालेला होता.प्रत्येकाची आपली काम उरकून सगळे जण वॉटर कपला जाण्यासाठी घाई करत होता.ग्रामदैवत मारुती मंदिराच्या समोर सगळे जमा झाले. एक प्रार्थना करण्यात आली आणि सुरू झालं एक मिशन ट्रॅक्टर ट्रॉली, रिक्षा, दुचाकी या वाहनातून रॅली द्वारे सगळे कामाच्या ठिकाणी पोहचले.सगळा भुंडा असणारा माळ रंगीबेरंगी झाला. याठिकाणी सर्वांना एकत्र बसवून 45 दिवसांचे नियोजन संगण्यात आलं व तांत्रिक बाबींची माहिती देत आपणाला करावयाचे काम हे तंत्र शुध्द पध्दतीने करायचे आहे असं सांगत कामाला सुरुवात झाली. सकाळी सकाळी माळरानावर खण खण असा आवाज येत काळ्या मातीची सेवा करण्याचं काम सुरू झाले सगळे गावकरी महिला युवक युवती अगदी एकाद्या कुटुंबातील असल्या प्रमाणे काम करत होते त्याच बरोबर वयोवृध्द त्यांचे आत्मबल वाढवत होते अनेक महिला भगीणी ज्या कधीही स्वतःच्या रानात शेतात गेल्या नाहीत आशा महिला भगीणी लहान बाळांना घेऊन या श्रमदानात सहभागी झाल्या होत्या त्यांचा उत्साह खूप वाढला होता. दोन तासात खूप काम लोकांनी केलं आता यापुढे ही 45 दिवस असच जोमाने काम करणार आहे अशी प्रतिक्रिया दिली
दरम्यान रात्री 12 वाजता सर्वत्र स्मशान शांतात आणि गोंदवले खुर्दच्या माळरानावर केवळ टिकाव आणि खोर यांचा खण खण असा आवाज ऐकू येत होता.निमित्त होत वॉटर कपच्या कामाची सुरुवात करण्याची, रात्री 12 वाजता गावातील सुमारे पाचशे युवक,युवती,जेष्ठ नागरिक, यांनी तिथं जाऊन रात्री उत्स्फुर्त पणे श्रमदान करून वॉटर कपच्या कामाची सुरुवात दणक्यात केली आहे.
8 एप्रिल या दिवशी वॉटर कप स्पर्धेला सुरूवात झाली असून सलग 45 दिवस ही स्पर्धा चालणार आहे.रविवारी मध्यरात्री 11 वाजता गोंदवले खुर्द ता माण या गावचे सर्व नागरिक वॉटर कप पुन्हा माण तालुक्यात आणण्यासाठी कामाला लागला असून रात्री 11 मारुती मंदिरा समोर सगळे जमा झाले आणि एकत्र रित्या गोंदवले खुर्द ते रानंद रस्त्यावर असणार्या कामाच्या साईड वर जाऊ लागले. लोकांना रात्रीच्या अंधारात त्रास होऊ नये म्हणून एका जीप मध्ये जनरेटर ठेवून त्या द्वारे प्रकर लाईट सुरू केल्या होत्या त्याच बरोबर लोकांचे मनोबल वाढविण्यासाठी रिक्षात स्पीकर लावून गावं हे आपलं सुंदर करायचं हे प्रेरीत करणार गीत लावण्यात येत होतं रात्रीच्या शांत वातावरणात सुमारे दीड तास चांगले काम करण्यात आले.
वॉटर कप जिंकायचाच या निर्धाराने ग्रामस्थांसह महिलांचे श्रमदान
RELATED ARTICLES