म्हसवड : माण तालुक्यात दुष्काळाची भिषणता कमालीची वाढली असून तहसीलदार बी. एस. माने यांच्या नेतृत्वाखाली ढाकणी तलाव परिसरात धाड टाकण्यात आली असून तलाव्याच्या खालील शेतकर्याने पळशी गावास पाणीपुरवठा करण्यासाठी बांधण्यात आलेल्या विहिरीतून शेतीसाठी चोरून पाणी वापरत असल्याचे निदर्शनास आल्याने सयुक्त पथकाने विद्युत मोटार जप्त करून तलाव्याच्या एक किलोमीटर अंतरावर असलेल्या विहिरी वरील कनेक्शन बंद पाईप जप्त करण्यात आल्या असून यापुढे शेतकर्यांनी चोरून पाणी वापरल्यास कडक कारवाई करणार असल्याचा इशारा तहसीलदार माने यांनी दिला आहे.
माण तालुक्यातील जनता दुष्काळाशी लढा देत असून पिण्याच्या पाण्यासाठी टँकरच्या पाण्यासाठी तडफडत आहे.अश्या बिकट परिस्थितीत जनतेची तहान भागवण्यासाठी शासनाने ढाकणी तलाव्यात उरमोडीचे पाणी सोडल्याने काही अंशी लोकांची तहान भागवण्यात येत असून हे सोडलेले पाणी फक्त जनतेची तहान भागवण्यासाठी वापरण्यात यावे म्हणून नुकतेच जिल्हाधिकारी श्वेता सिंघल, प्रांताधिकारी कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली तलाव्यांच्या एक किमी अंतरात असलेल्या सर्व विहिरीवरील कनेक्शन बंद करून शेतीच्या पाण्या ऐवजी पिण्याच्या पाण्यासाठी महत्व देण्यात यावे यासाठी शेतकर्यांच्या विहिरी वरील विद्युत मोटारीना विद्युत पुरवठा करणार्या डीपी बंद करण्याचे आदेश दिले होते. या नुसार माणच्या तहसीलदार बी.एस.माने यांच्या नेतृत्वाखाली पाणीपुरवठा अभियंता, वीजवितरण, तलाठी, पोलिस पाटील यांच्या संयुक्त पथकाने कारवाई करून ढाकणी येथील शेतकरी पळशी गावासाठी पाणी पुरवठा करण्यासाठी मागील दुष्काळात ग्रामपंचायतीने विहिर पाडली होती.सध्या त्या विहिरीतून पळशी गावासाठी पाणी पुरवठा बंद आहे. त्याचा फायदा संबंधित शेतकरी मुलगा प्रशासकीय सेवेत मोठा अधिकारी असल्याने त्याच्या वजनाचा फायदा घेत चक्क शासकीय विहिरीत साडेसात एच.पी.ची विद्युत मोटार टाकून ऊसाची शेती करत होता. सदर विद्युत मोटार पाईप व केबल जप्त करण्यात आले असून इतर शेतकर्यांचे एक हजार फुट पाईप चारशे फुट केबल जप्त करण्यात आले असून काल राणंद येथील तलाव्यातही कारवाई करण्यात आली असून तिथेही बारशे फुट पाईप, पाचशे फूट केबल जप्त केल्या आहेत.
दुष्काळी परिस्थिती बिकट होत चालली असून लोकांच्या पिण्याच्या पाण्यासाठी ढाकणी तलाव्यातील फिडिंग पॉईंट वरून सुमारे अर्धा तालुका टॅकरवरून तहान भागवत असताना शेतकरी वर्गाने दुष्काळाचे गांभीर्य लक्षात घेऊन पाण्याची चोरी करू नये तलाव्याच्या परिसरातील विहिरी वरील विद्युत मोटारी सुरू करू नयेत अन्यथा पुढील काळात कडक कारवाई करण्यात येईल असा इशारा तहसीलदार माने यांनी दिला आहे.
दरम्यान पथका मध्ये पाणीपुरवठा अभियंता सुभाष खाडे, कुकुडवाड मंडलाधिकारी अहिवले, वडजल तलाटी सौ. पाटील, संतोष ढोले,नरळे, सुर्यवंशी, जामनेकर, सचिन शिंदे, किसन गुजर, विजय वाघमारे, वडजल पोलिस पाटील मोनाली बनसोडे कुकुडवाड पोलिस वैशाली काटकर, तोरणे, शिंदे आदिंचा समावेश होता.
गावास पाणीपुरवठा करणार्या विहिरीतून पाणी चोरणार्यांवर धाड
RELATED ARTICLES

