पाटण (शंकर मोहिते) : पाटण मध्ये सोमवारी गणेश चतुर्थी दिवशी घरा- घरात मोठ्या उत्साहात गणरायाचे आगमन झाले. पाटणच्या कुंभार वाड्यात गणरायाची मूर्ती खरेदीसाठी गणेश भक्तांची एकच गर्दी झाली होती. सकाळी 7 वा. पासून घरगुती गणपती च्या प्राण प्रतिष्ठापना होत होत्या. रात्री उशिरापर्यंत सार्वजनिक गणपतींचे वाजत गाजत आगमन सुरू होते. तर काही घरगुती व सार्वजनिक गणेश मंडळांनी रविवारी सांयकाळी गणपती आगमन केले.
सकाळ पासून घरगुती गणपतींचे आगमन आणि प्रतिष्ठापना झाल्यानंतर दुपार पासून सार्वजनिक मंडळांच्या गणपतींचे वाजत गाजत जल्लोषात रात्री उशिरा पर्यंत आगमन आणि प्रतिष्ठापना सुरू होते.
पाटण शहरात मानाचा मानला जाणारा हनुमान सेवा मंडळाच्या गणपतीची प्रतिष्ठापना सांयकाळी च्या सुमारास करण्यात आली. तर समाज सेवा संघ, नुतन तरूण मंडळ, अष्टगंध गणेश मंडळ, कलाकार गणेश मंडळ, बाल गणेश मंडळ, नवरत्न गणेश मंडळ, अष्टविनायक तरूण मंडळ, गजानन गणेश मंडळ, शिवलिंग गणेश मंडळ, रणजित गणेश मंडळ, शिवाजी उदय गणेश मंडळ, प्रताप सेवा गणेश मंडळ, जय भारत गणेश मंडळ, श्री राम गणेश मंडळ, या मंडळासह पाटण परिसरातील सार्वजनिक गणेश मंडळांच्या गणपतींचे आगमन प्रतिष्ठापना सोहळा रात्री उशिरापर्यंत सुरू होता.
वाजत गाजत जल्लोषात पाटण मध्ये गणपतींचे आगमन
RELATED ARTICLES