पाटण : पाटण तालुक्यासह कोयना धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस पडत असल्याने कोयना धरण शिवसागर जलाशयाची पाणी पातळीत झपाट्या वाढ होत आहे. गेल्या 24 तासात पाऊसाने धरणातील पाणी पातळी 2067.06 फूट असून 630.174 मीटर आहे. तर टी.एम.सी. मध्ये हा पाणी साठा 25.47 इतका झाला आहे. तर कोयना धरण परिसरात शनिवार, रविवारी दमदार झालेल्या पाऊसाने कोयना धरण शिवसागर जलाशयात प्रतिसेकंद 38,056 क्युसेस पाण्याची आवक झाली आहे. या काळात 4.64 टि.एम.सी.ने वाढ झाली आहे. कोयनेसह पाटण तालुक्यात मोरणा- गुरेघर, निवकणे, चिटेघर, तारळी, वांग-मराठवाडी या लघुपाटबंधारे धरण परिसरात दमदार पाऊस पडत आहे. समाधान कारक होत असलेल्या पाऊसाने शेतकर्यांनी भात लागवडीला जोर धरला आहे.
पाटण तालुक्याच्या विविध भागात शनिवार पासून पावसाचा जोर पुन्हा वाढला असून तालुक्यातील सर्वच नद्या ओढे दुतड्या भरून वाहत आहेत. बुधवार व गुरुवार पासुन पाउस प्रमाण कमी आले होते. दोन दीवसाच्या विश्रांतीनंतर शनिवार पासून गेले दोन दिवस पावसाने पाटण तालुक्यात दमदार सुरवात केली आहे. त्यामुळे कोयना धरणाच्या पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. तालुक्यातील कोयना, केरा, मोरणा, काजळी, उत्तरमांड, तारळी, वांग या नद्याच्या पाणि पातळीत झपाट्याने वाढ होत असल्याने या नद्या तुडुबं भरुन वाहत आहेत.
कोयना धरण परिसरात शनिवारी 6 जुलै ते रविवार 7 जुलै सायंकाळी 5 वाजे पर्यंत गेल्या 24 तासात कोयना येथे – 372 ( एकुन-1356 ) मि.मी., नवजा येथे- 361 (एकुन-1553 ) मि.मी. तर महाबळेश्वर येथे- 246 (एकुन- 1408 ) मि.मी. पाऊस पडल्याची नोदं झाली आहे.
कोयनेत दमदार पाऊस; धरणात 24 तसात 4.64 टि.एम.सी. ने वाढ
RELATED ARTICLES