Tuesday, June 24, 2025
Homeठळक घडामोडीएसटी बस - दुचाकीच्या अपघातात दोघांचा मृत्यू

एसटी बस – दुचाकीच्या अपघातात दोघांचा मृत्यू

फलटण : महाड-पंढरपूर राज्य रस्त्यावर बरड ता. फलटण गावचे हद्दीत एस. टी. बस आणि दुचाकीच्या भीषण अपघातात दुचाकीवरील दोघांचा मृत्यू झाला असून एक महिला गंभीर जखमी झाली आहे.
याबाबत फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यातून देण्यात आलेल्या माहितीनुसार, फलटण बाजूकडून पंढरपूरकडे जाणारी स्वारगेट(पुणे)-पंढरपूर एस टी बस (एम एच 07 सी 7130)आणि एम. एच. 13 व्ही 6729 या दोन वाहनांचा अपघात येथून 18 कि मी अंतरावर बरड ता. फलटण गावचे हद्दीत भोईटे पेट्रोल पंपानजिक घडला.
सौ. पुनम आकाश पंढरे (वय 25 रा. 22 फाटा, धुळदेव, ता. फलटण) यांच्या न्यायालयातील कोर्ट केससाठी जीवंधर श्रीरंग बजबळकर (रा. पिंपरी, ता. माळशिरस), प्रेम आकाश पंढरे (रा. 22 फाटा धुळदेव, ता. फलटण), सौ. पूनम आकाश पंढरे (वय 25, रा. 22 फाटा धुळदेव) हे तिघेजण बुलेट मोटार सायकलवरुन पंढरपूर बाजूकडून फलटण बाजूकडे जात असताना फलटण बाजूकडून भरधाव वेगात येणार्‍या स्वारगेट-पंढरपूर एस टी बसने सदर दुचाकीला जोराची धडक दिल्याने त्यामध्ये दुचाकीवरील तिघेही गंभीर जखमी झाले, त्यापैकी प्रेम आकाश पंढरे यांचा जागीच मृत्यू झाला, तर जीवंधर श्रीरंग बजबळकर यांचे येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरु असताना निधन झाले असून सौ. पूनम पंढरे यांच्यावर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत, त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे उपचार करणार्‍या डॉक्टरांनी सांगितले आहे.
दरम्यान एसटी बस चालक राजेंद्र नागुदास सातपुते, रा. पंढरपूर या बस चालकाविरुद्ध फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलीस उप निरीक्षक बोंबले अधिक तपास करीत आहेत.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular