Monday, June 23, 2025
Homeठळक घडामोडीकु. स्नेहलची रेंज फॉरेस्ट ऑफिसर पदी निवड

कु. स्नेहलची रेंज फॉरेस्ट ऑफिसर पदी निवड

फलटण : तरडगाव, ता. फलटण येथील कु.स्नेहल राजेंद्र अडसुळ यांची रेंज फॉरेस्ट ऑफिसर पदी निवड झालेली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे वनसेवा विभागासाठी 2018 घेण्यात आलेल्या परिक्षेमध्ये तिने यशाला गवसणी घातली आहे.ओबीसी महिला प्रवर्गातून तिने राज्यात प्रथम क्रमांक मिळवित एक वेगळाच ठसा उमटविला आहे.
तिचे बारावी पर्यंत चे शिक्षण हे वाई येथे झाले आहे. बीएससी ही डॉ. बाळासाहेब सावंत कृषी विद्यापीठातुन पूर्ण केली तर महात्मा फुले कृषीविद्यापीठ राहुरी येथे एमएससी पूर्ण केली. एक वर्ष स्पर्धा परीक्षेचा अभ्यास केला.स्नेहलचे वडील हे पोलिस खात्यात कार्यरत असून तिच्या यशाबद्दल कूटुंब नातेवाईक तरडगाव सह सर्वत्रच कौतुक केले जाते आहे.काही वर्षांपूर्वी संदीप कुंभार यांनी ही या क्षेत्रात यश मिळविलेले आहे.अजुन ही काहीनी स्पर्धा परीक्षेच्या माध्यमांतून यश मिळविलेले असताना तरडगाच्या शिरपेचात हा मानाचा तुरा रोवला गेला आहे.त्यामुळे तरडगावची ओळख ही अधिकारी वर्गाचे गांव म्हणुन पुढे उदयास येत आहे.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular