फलटण : लूटमार करण्याच्या हेतुने येथील एका व्यापार्याच्या मदतीला आलेल्या त्याच्या मुलाच्या डोळ्यात मिरची पूड टाकून त्यांना चा़कूने भोसकुन गंभीर जखमी करण्याची घटना काल रात्री घडली आहे या प्रकरणी एका संशयिताला अटक करण्यात आली असून घटनेच्या निषेधार्थ आज सकाळी व्यापार्यानी काही काळ दुकाने बंद ठेऊन पोलिसांना निवेदन दिले.
प्रीतम गांधी रा. सिटी बज़ार समोर, लक्ष्मीनगर फलटण यांचे अरविंद क्लॉथ हे कपडयांचे दुकान असून रात्री 9.30 वा दुकान बंद करून ते जवळच असणार्या घरी जात असताना घराजवळील पार्किंगमध्ये दबा धरून बसलेल्या तिघानी त्यांची बैग हिसकविण्याचा प्रयत्न केला त्यावेळी प्रीतम गांधी यांचा मुलगा पार्श्व (वय 17) याने हा प्रकार पाहताच तो पळत आला त्याने तिघाना आरड़ाओरड करीत विरोध केला असता तिघा पैकी एकाने आपल्या जवळील चाकू जीवे मारण्याच्या उद्देशाने प्रीतम गांधी यांच्या पाठीत घुपसला तिघानी दोघांना मारहाण केली आणि बैग हिस्कावून दुचाकी वरुन पळून जाऊ लागले यावेळी पार्श्व याने एकाला गाडीवरुन खाली पाडुन पकडूंन ठेवले यावेळी आरड़ाओरड ऐकून बाजुचे नागरिक आले त्यांनी पार्श्वने पकडलेल्या आरोपीला पकडून ठेवले इतर दोघे मोटरसायकल वरुन पळून गेले पकडलेल्या आरोपीचे नाव अनिकेत नरेंद्र कदम(वय 19 रा सगुनामाता नगर, मलटण, फलटण) असे आहे गांधी पिता पुत्रावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत त्या बैगमध्ये किती पैसे होते हे समजू शकले नाहीत.
सदर घटनेची माहिती समजताच शहरातील सतप्त व्यापारयानी आज सकाळी दुकाने बंद ठेऊन फलटण शहर पोलिस ठाण्यात येऊन पोलिस निरीक्षक प्रताप पोमन यांना निवेदन देऊन आपल्या सतप्त भावना व्यक्त केल्या फरारी आरोपिना लवकर पकडून त्यांच्यावर कड़क करवाई करण्याची मागणी केली या घटनेची माहिती कळताच नगरपालिकेतिल विरोधी पक्षनेते समशेरसिंह नाईक निंबाळकर, स्वराज संघटनेचे अध्यक्ष दिंगबर आगवने यांनीही पोलिस ठाण्यात येऊन खूनी हल्याचा निषेध केला व्यापारयाना सरक्षण देण्याची आणि शहरात पोलिस बंदोबस्त वाढविन्याची त्यांनी मागणी केली हलेखोरावर कड़क कार्रवाई करण्याचे आश्वासन पोमन यांनी यावेळी दिले त्यानंतर व्यापार्यानी विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निम्बाळकर यांची भेट घेऊन त्यांनाही निवेदन दिले.
सदर घटनेची फ़िर्याद पार्श्व गांधी यांनी फलटण शहर पोलिस ठाण्यात दिली आहे अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक बनकर करीत आहेत.
व्यापार्याच्या मदतीला आलेल्या मुलाच्या डोळ्यात मिरची पूड टाकून भोसकले
RELATED ARTICLES