Friday, June 20, 2025
Homeठळक घडामोडीफलटण शहरातील पाणी पुरवठा आज बंद राहणार

फलटण शहरातील पाणी पुरवठा आज बंद राहणार

फलटण – श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे निमित्ताने फलटण मध्ये मुक्कामी येणार असल्याने फलटण शहराला पाणी पुरवठा होत असलेल्या मोटार विद्युत पंप यांची दुरुस्ती करून घेण्यासाठी आज मंगळवारी दि.11 रोजीचा होणारा पाणी पुरवठा बंद राहणार असल्याचे नगरपालिका यांचे वतीने प्रसिद्धी पत्रकाद्वारे सांगितले आहे.
फलटण नगरपालिका यांचे वतीने सोमवार पेठ येथील ठिकाणाहून शहराला पाणी पुरवठा केला जातो मात्र श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा गुरुवार दि. 4 जुलै रोजी मुक्कामी येणार असलेने व भाविकांना व्यवस्थित पाणी पुरवठा व्हावा या साठी सुधारित जलकेंद्र येथे असणार्‍या मोटर विद्युत पंप यांची दुरुस्ती करण्यासाठी एक दिवस संपूर्ण शहरातील पाणी पुरवठा बंद राहणार असल्याचे सांगितले असून लोकांनी सहकार्य करावे असे आवाहन मुख्याधिकारी प्रसाद काटकर यांनी केले आहे.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular