Saturday, June 21, 2025
HomeUncategorizedखा. रणजितसिंह नाईक निंबाळकरांचा छ. शिवाजी महाराजांना अभिवादन करुन संसदेत प्रवेश

खा. रणजितसिंह नाईक निंबाळकरांचा छ. शिवाजी महाराजांना अभिवादन करुन संसदेत प्रवेश

फलटण – तब्बल 23 वर्षानंतर फलटणचा खासदार लोकशाहीने निर्माण केलेल्या संसदेत पाऊल ठेवताना अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत छ. शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या व आपली सासुरवाडी असलेल्या व प्रभू श्रीराम यांच्या नावाने ओळखल्या जाणार्‍या फलटणच्या सुपुत्राने छ. शिवाजी महाराजांना अभिवादन करून आशीर्वाद घेत संसदेच्या पायर्‍यांवर नतमस्तक होऊन प्रवेश केला यावेळी फलटण कारांची मान उंचावत सर्वसामान्य लोकांची कामे करण्यासाठी खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर दाखल झाले.
फलटण म्हणजे एक ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेले गाव त्या गावातून 1996 साली माजी खासदार हिंदुराव नाईक निंबाळकर यांच्या रूपाने पहिले खासदार होण्याचा मान मिळाला त्यांच्या नंतर आज सोमवारी दि.17 रोजी त्यांचे सुपुत्र व स्वराज उद्योग समूहाचे शिल्पकार खा.रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी दिल्ली येथील महाराष्ट्र सदन येथील छ. शिवाजी महाराज यांना अभिवादन केले त्या नंतर त्यांनी ज्या ठिकाणी लोकशाहीचा गौरव केला जातो तसेच कायदे केले जातात अशा संसदेत पायर्‍यांवर नतमस्तक होऊन माझ्या हातून माढा लोकसभा मतदारसंघातील दुष्काळी जनतेची कामे होवोत व त्यांना कायमस्वरूपी दुष्काळग्रस्त भाग असा कलंक मिटावा असा प्रयत्न माझ्या हातून व्हावे व युवा पिढीला नोकरीच्या संधी उपलब्ध करून त्यांच्या हाताला काम मिळावे या साठी मला छ. शिवाजी महाराजांनी आशीर्वाद द्यावेत अशी भावना व्यक्त केली आहे.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular