Wednesday, June 25, 2025
Homeठळक घडामोडीफलटण शहरासह ग्रामीण भागाला पावसाने झोडपले

फलटण शहरासह ग्रामीण भागाला पावसाने झोडपले

फलटण – फलटण शहरासह ग्रामीण भागात गेली अनेक दिवस पावसाने दडी मारली होती या मुळे शेतकरी या दुष्काळी परिस्थिती मुळे मेटाकुटीला आला होता मात्र आज सोमवारी दुपारी तीनच्या दरम्यान फलटण शहरासह आसपासच्या ग्रामीण भागात जोरदार पाऊस पडला असून या पहिल्याच पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी काहीसा सुखावला आहे.
फलटण शहर व परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास परिसरात पाऊस सुरू झाला. सुमारे अर्धा तास जोरदार पाऊस पडत होता. या पावसामुळे अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचले होते. हा पाऊस शेतीसाठी उपयुक्त असून शेतकर्‍यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
गेली अनेक दिवसांपासून पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या बळीराजाला सोमवारी दि.24 रोजी कुठे जादा तर कुठे मध्यम या पावसाने दिलासा दिला. गेली दोन दिवस सकाळपासूनच हवेमध्ये प्रचंड उष्मा निर्माण झाला होता. मात्र आज दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास आकाशात ढग जमा होऊन विजांचा कडकडाट पाऊस सुरु झाला. तीन वाजण्याच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली. सुमारे अर्धा तास पडलेल्या पावसाने सर्वत्र पाणी पाणी केले. रस्त्यांसह टणक भागावरून पाणी वाहू लागले तर सखल भागात पाणी साचले होते.
फलटण शहरांमध्ये अचानक सुरू झालेल्या या पावसाने व्यावसायिकांची तारांबळ उडाली माञ पाऊस पडला पाहिजे अशी सर्वांची अपेक्षा होती ती काही प्रमाणात पूर्ण झाली आहे. हा पाऊस शेतीसाठी उपयुक्त मानला जात असून बळीराजा सुखावला आहे. दुपारी तीन नंतर ही काही ठिकाणी जोरदार पाऊस सुरू होता. फलटण शहरासह ग्रामीण परिसरात पावसाने लावलेल्या हजेरीमुळे शेतकर्‍यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
काल रविवारी झालेल्या तरडगाव, वाठार निंबाळकर या मंडल परिसरात जोरदार पाऊस पडला. आज सोमवार दि. 24 रोजी सकाळी संपलेल्या 24 तासात झालेला एकूण मंडल निहायपाऊस खालीलप्रमाणे – फलटण 00 मि. मी. आसू 00 मि. मी. बरड 00 मि. मी., तरडगाव 44 मि.मी. आदरकी 15 मि. मी. राजाळे 00 मि. मी. होळ 6 मि. मी. वाठार निंबाळकर 49 मि. मी. गिरवी 10 मि. मी.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular