फलटण : फलटण ते पंढरपुर रस्त्यावर विडणी (ता फलटण) गावच्या हद्दित अज्ञात वाहन चालकाने पाठीमागुन दिलेल्या धड़केत मोटार सायकलवरिल 23 वर्षीय युवक जागिच ठार झाला आहे. या अपघातानंतर चारचाकी वाहन चालक पळून गेला आहे
आज पहाटे 5.30 च्या दरम्यान फलटण पंढरपूर रोडवर विडणि गावच्या हद्दित पवारवाडी शाळेच्या पुढे गणेश गाडे यांच्या घरा समोर पिंप्रद(ता फलटण) येथील युवक राहुल उर्फ सागर सुरेश निंबाळकर (वय 23) हा स्वराज दुध डेरीमध्ये कामाला जाण्यासाठी मोटरसायकल (डिस्कव्हर चक 12 ऊट 3127) या गाडीवर निघाला असता पाठीमागुन अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली यामध्ये तो युवक जागीच ठार झाला आहे. कुटुंबात तो एकुलता एक व कर्ता पुरुष होता.
मिलीटरी व पोलीस भरतीसाठी सतत प्रयत्न करत होता या घटनेमुळे निंबाळकर कुटुंबावर प्रचंड शोककळा पसरली आहे. या घटनेची फिरयाद बबन दत्तू निंबाळकर यांनी फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यात दिली आहे अधिक तपास सपोनि भोळ करीत आहेत.
अज्ञात वाहनाच्या धडकेत युवक ठार
RELATED ARTICLES

