Wednesday, December 3, 2025
Homeठळक घडामोडीफलटण येथील माउलींच्या पालखी तळावरील तयारी पूर्ण

फलटण येथील माउलींच्या पालखी तळावरील तयारी पूर्ण

फलटण (अशोक भोसले) : श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा 2019 करीता दि. 26 / 6 / 2019 रोजी जिल्हाधिकारी सातारा यांची फलटण विभागातील सर्व खाते प्रमुखांची पालखी विषयक पुर्वतयारी आढावा बैठक घेतली यावेळेस संतोष जाधव, उपविभागागीय अधिकारी फलटण, हनुमंत पाटील तहसिलदार फलटण तसेच सर्व विभागाचे विभाग प्रमुख उपस्थित होते. बैठकीमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाने पालखी मार्गावरील सर्व खडडे व साईडपट्टया भरुन घ्यावेत. व योग्य तेथे रोडपेंटींग करावेत अशा सुचना दिल्या.
यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाने पालखीसाठी करावयाच्या आवश्यक ती सर्व तयारी पुर्ण झाली असून पालखी तळावर पावसामुळे चिखल होणार नाही याचे नियोजन केलेचे सांगितले. जिल्हा परिषद बांधकाम विभाग यांनी त्यांचे अंतर्गत येणारे वडले ते पिंपद्र रस्ता दुरुस्तीचे काम 4 ते 5 दिवसात पुर्ण करुन घेत असलेबाबत बैठकीमध्ये सांगितले. आरोग्य विभागाकडून पालखी सोहळ्याच्या अनुषंगाने पिण्याच्या पाण्याचे साठे तपासून घेतले असून त्याचा अहवाल प्राप्त झाला असल्याचे सांगितले. पाणी निर्जतूककरण करणेसाठी टीसीएन पावडरचा साठा पुरेशा प्रमाणात उपलब्ध असल्याचे सांगितले. पालखी कालावधीत 9 रुग्णवाहीका उपलब्ध केल्या असून त्या शिवाय 108 क्रमांकाची रुणवाहीका तैनात ठेवणेत आलेली आहे . पालखी कालावधीत पालखी मार्गावरील खाजगी रुग्णालयातील कॉट आरक्षीत करणेत आलेली आहे. मोबाईल ओपीडी सुरु करणेत आलेली आहे. पालखी तळाचे पालखी आगमनापुर्वी व प्रस्थानानंतर संपुर्ण निर्जतूकीकरण करण्यात येणार आहे. ग्रामिण पाणी पुरवठा विभागाकडून पाणी पुरविण्यासाठी 27 शासकिय टंकर उपलब्ध करणेत आलेले आहे. व आवश्यकते प्रमाणे खाजगी टॅकर उपलब्ध करणेत येणार आहे याद्वारे दैनंदिन 500 टैंकर खेपाचे नियोजन करणेत आले आहे
सर्व फिडींग पाईंटवर 24 तास कर्मचारी नियुक्त करणेत आलेले आहे . पालखी मार्गावरील पुरविणेत आलेल्या खाद्यपदार्थ व पिण्याच्या पाण्याची तपासणी करणेसाठी अन्न व औषध प्रशासनास सूचना देण्यात आलेली आहे. निरा उजवा कालव्यातून दि 29 जून 2019 ते 12 जुलै 2019 या दरम्यान पाणी सोडण्याचे नियोजन असून पालखीसाठी पुरेसे पाणी राखीव ठेवणेत आलेले आहे. वारकर्‍यांचे आवश्यकतेप्रमाणे तहसिल कार्यालयाकडून 24000 हजार लि रॉकेल व 4000 गॅस सिलेंडर टाक्या प्रत्येक मुक्कामाच्या ठिकाणी उपलब्ध करुन देण्यात आले आहेत.
मुक्कमाच्या ठिकाणी मागणी प्रमाणे विज कनेक्शन जोडणे विदयुत कंपनी करून करणेत येणार आहे . यासाठी मागणी अर्ज भरुन मागणी नोंदवीने आवश्यक असल्याचे सांगितले. पोलीस विभागाने संपुर्ण पालखी मार्ग व पालखी तळावर पुरेशा पोलीस बंदोबस्त देण्यात आलेला आहे. सर्व पालखी तळावर वॉच टॉवर उभारणेत आलेले आहेत. संपुर्ण पालखी मार्गावर पेटोलिंग व वाहतुक नियोजन करणेत आलेले आहे. फलटण नगर परिषदेने त्यांचे हददीत फलटण मुक्कमाच्या वेळेस 1000 चराचे शौचालय तात्पुरत्या स्वरुपात उभारणेत येणार आहे. पाणी पुरवठयासाठी 4 फिडींग पॉईट तयार करणेत आले असून त्या सर्व ठिकाणी 24 तास र्कचारी उपलब्ध ठेवणेत येणार आहे. याशिवाय शहरातील एसटीचे वाहतुकीस येणारा अडथळा लक्षात घेवून एसटी महामंउळाने कोळकी मुधोजी महाविदयालय गोंविद डेअरी सोमवारपेठ येथील कंटोल शेड उभे करणेत येणार आहे. अशा प्रकारे फलटण तालुक्यातील प्रशासनाकडून पालखी सोहळा 2019 बाबत नागरीकांच्या माहितीसाठी माहितीप्रसारीत करणेत आलेली आहे.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular