फलटण : फलटण तालुक्यात नाईक निंबाळकर एक नाहीत आमचा आणि विरोधी नाईक निंबाळकरांचा संबंध नाही इथे भाऊपणा नाही तर इथे विकासाचे आणि शरद पवार सांगतील तेच राजकारण चालते आम्ही प्रामाणिक काम करणारी माणसे असून विरोधकांची कायमची खोड आता निवडणुकीच्या निमित्ताने आम्ही मोडल्याशिवाय राहणार नाही असा इशारा विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी दिला.
माढा लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संजय शिंदे यांच्या प्रचारार्थ येथील अनंत मंगल कार्यालयात महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.त्यावेळी रामराजे नाईक निंबाळकर बोलत होते यावेळी राष्ट्रवादीचे उमेदवार संजय शिंदे, जिल्हा परिषद अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर ,आमदार दीपक चव्हाण, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रघुनाथराजे नाईक निंबाळकर, ज्येष्ठ नेते सुभाषराव शिंदे फलटण पंचायत समितीच्या सभापती प्रतिभा धुमाळ, फलटण नगरपरिषदेचे नगराध्यक्षा निता नेवसे राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष मिलिंद नेवसे राष्ट्रवादी काँग्रेसचे सातारा जिल्हाध्यक्ष सुनील माने, महानंद डेअरी चे उपाध्यक्ष डी.के.पवार आदी उपस्थित होते
माढा लोकसभा मतदारसंघातून संजय शिंदे यांना राष्ट्रवादी काँग्रेसने दिलेली उमेदवारी योग्य असून त्यांना फलटण तालुक्यातून मोठे मताधिक्य देण्याची जबाबदारी आता आपणा सर्वांची वाढलेली आहे.भाजपामधून आपल्या तालुक्यातिल दुसरा उमेदवार भाजपच्या चिन्हावर उभा असला तरी तो आपल्या तालुक्यातील उमेदवार आहे.म्हणून त्यांच्या मागे न जाता शरद पवारांचा विचार जपणार्या राष्ट्रवादीच्या उमेदवाराच्या मागेच सर्वांनी ठाम राहणे गरजेचे आहे असे रामराजेनी स्पष्ट केले
आमच्या आणि विरोधकांचे आडनाव एक सारखे असले तरी आमची त्यांची काही भावकी नाही आमचे ते विरोधकच आहेत या लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने ते समोरासमोर आल्याने त्यांची कायमची खोड मोडण्याची नामी संधी आली आहे संजय शिंदे ही लढाई तुमची नाही तर आमची आणि त्यांची असून त्यांचा पराभव केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असा इशारा रामराजे यांनी रणजीतसिंह नाईक निम्बाळकर यांचे नाव न घेता दिला
आमच्या तालुक्यातिल विरोधकांना काही देणेघेणे नाही स्वतःच्या स्वार्थासाठी यापूर्वी शिवसेनेतून राष्ट्रीय काँग्रेस मध्ये आणि तेथून आता भाजपमध्ये प्रवेश केला असून पुढच्या निवडणुकीला ते वंचित आघाडीतून पण दिसतील असा उपरोधिक टोला लगावला साखर कारखानदारी व दूध संघ वाचवण्यासाठीच किंवा काहीतरी स्वार्थ साधण्यासाठीच त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे 1996 पुनरावृत्ती घडविन्याचा त्यांचा दावा आपन यशस्वी होउ देणार नाही संजय शिंदे तुम्ही नशिबवन आहात कारण या निवडणुकीच्या माध्यमातून त्यांचे आणि तुमचे नाते तुटले कारण त्यांनी ज्यांच्या ज्यांच्याशी नाते ठेवले त्यांचे वाटोळे झाले आहे या नाईक निम्बाळकरांच्या कारनाम्यामुळे मला नाईक निम्बाळकर नाव बदलावेसे वाटते असा उपरोधिक टोलाही रामराजेनी लगावताना रणजीतसिंहावर जोरदार टीकास्त्र सोडले
माझे नाते राष्टवादी कांग्रेस बरोबर पूर्वीपसुनच आहे सोलापुर जिल्ह्याचे नेतृत्व ज्यांच्याकड़े होते ती माणसे चुकीचे वागत होती त्यांनी बर्याच चुका केल्या,अनेकांना अडचणीत आणले त्यामुळे आपन राष्टवादि कडून दूर झालो असे विजयसिंह मोहिते पाटिल यांचे नाव न घेता स्पष्ट करतानाच ज्याना राष्टवादिने भरभरून दिले ति मंडळी स्वार्थसाठी दुसर्या पक्षात आता गेली आहेत त्यांना जनता माफ करणार नाही राष्टवादि कांग्रेसने मला उमेदवारी देताना जो विश्वास दाखविलाय तो सार्थ करुच पन एक आदर्श असा मतदारसंघ घडवू असा विश्वास संजय शिंदे यांनी व्यक्त केला
विरोधकांची कायमची खोड मोडल्याशिवाय राहणार नाही : ना. रामराजे
RELATED ARTICLES