Monday, June 23, 2025
Homeठळक घडामोडीफलटण शहरातील अतिक्रमणे बोकाळली

फलटण शहरातील अतिक्रमणे बोकाळली

रस्त्यावर लोखंडी जाळ्या लावणार्‍यावर कारवाई करण्याची मागणी
फलटण : येथील शहरातील अतिक्रमणे बोकाळली असताना कोणत्याही प्रकारची या बांधकामावर कारवाई होत नसल्याने पाहून आता चक्क रस्त्यावरच अतिक्रमणे सुरू असून या मुळे आज शहरातील मुख्य रस्त्यावर लावलेल्या लोखंडी जाळी मुळे एक मोठा अपघात होता-होता वाचला मात्र हा दुर्दैवाने अपघात घडला असता तर काय झाले असते ते सांगू शकलो नसतो असा एक अपघात घडला मात्र त्या अपघातात एका कारचे दोन्ही टायर ट्यूब फुटले या मुळे या मुजोर लोकांना आवरा नाहीतर खूप मोठा अनर्थ घडू शकतो अशी अवस्था फलटण शहराची झाली असून चक्क रस्त्यावर लोखंडी जाळ्या लावणार्‍यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी वाहन चालक करीत आहेत.
आज शनिवारी दि.13 रोजी सकाळी 10 वाजता लक्ष्मीनगर, स्तंभ चौक ते डेक्कन चौक या दरम्यान एका बँके समोर पार्किंगच्या प्रवन क्षेत्रात चक्क धारधार अशी टोकदार जाळी त्या बँकेने लावली आहे या वेळी कार चालक त्या ठिकाणी गेला असता या लोखंडी जाळीवर गाडी जाऊन डाव्या बाजूने दोन्ही टायर व ट्यूब फुटले मात्र चालकाने प्रसावधान राखल्याने कार पलटी झाली नाही, मात्र ती पलटी झाली असती तर खूप मोठा अनर्थ घडला असता या मुळे या मुजोर बँक व त्या भागातील लोकांनी लावलेल्या अनधिकृत जाळ्या काढून त्या जप्त करून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली जात आहे. दोन्ही टायर फाटल्याने हजारोचे नुकसान चारचाकीचे झाले आहे.
फलटण शहरातील वाढती अतिक्रमणे हटवण्यासाठी कोणीही पाऊल उचलत नसून आत्ता पर्यत या वाढत्या अतिक्रमणामुळे रस्ते गिळंकृत झाले असून या ठिकाणी अनेक वेळा वाहनचालकांच्या दुर्लक्षामुळे अनेक जणांना आपला जीव गमवावा लागला आहे मात्र फलटण नगर परिषद व फलटण शहर पोलीस ठाणे वाहतूक विभाग यांनी आजपर्यंत एकमेकावर बोट दाखवण्यापेक्षा काहीही केले नसल्याने वाहतुकीची समस्या फलटण शहरात जटिल झाली असून या वाहतुकीकडे कोणीही लक्ष देत नसल्याची खंत शहरवासीय बोलून दाखवत आहेत आगोदरच वाहतूकीची समस्या असताना शहरातील अनेक व्यावसायिक व ऑफिस, बँका यांनी रस्त्यावर ग्रील चे रेलिंग रस्त्यावर बसवले आहेत याचा रेलिंग मुळे आता वाहनचालक चांगलेच त्रस्त झाले असून गाडीचे टायर फाटने, पाय घसरून पडणे अशा घटनेत वाढ झाली आहे या अनधिकृत रेलिंग कडे नगर परिषद व पोलीस विभाग दुर्लक्ष करीत असल्याने दाद कोणाकडे मागायची असा प्रश्न पडला आहे. नगर परिषद व पोलीस शहर विभाग यांनी फलटण शहरातील अशा नियमबाह्य व धोकादायक रेलिग तत्काळ काढावेत अशी मागणी नागरिकांच्यातुन होत आहे.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular