Monday, June 23, 2025
Homeठळक घडामोडीफलटण तालुक्यात पाच लोकांना स्वाईन फ्ल्यूसदृश आजाराची लागण

फलटण तालुक्यात पाच लोकांना स्वाईन फ्ल्यूसदृश आजाराची लागण

फलटण : मिरढे, ता. फलटण येथे स्वाईन फ्ल्यूूचा एक रुग्ण आढळल्याने त्याच गावातील इतर लोकांची तपासणी केली असता त्यातच गावातील अजून 3 रुग्ण आढळून आले असून साखरवाडी तालुका फलटण येथे ही एक संशयित रुग्ण आढळला असल्याने एकूण पाच लोकांना स्वाईन फ्ल्यूूूसदृश आजाराची लागण झाली असल्याची माहिती (प्रभारी) तालुका वैद्यकीय अधिकारी आर. एम. जगदाळे यांनी दिली.
मिरढे तालुका फलटण येथे प्रकाश बबन काशीद वय 38 वर्षे यांना स्वाईन फ्लू झाला असून त्यांना अधिक उपचाराकरिता पुणे येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले असल्याने त्या गावातील इतर लोकांच्या घशाची व रक्ताची तपासणी केली असता त्याच गावातील 3 रुग्ण आढळले असुन त्यांना त्याच ठिकाणी उपचार देण्याबरोबरच टँमी फ्लूच्या गोळ्या देऊन त्यांच्यावर घरीच उपचार सुरू असल्याची माहिती डॉक्टर जगदाळे यांनी दिली. याच बरोबर साखरवाडी येथील एकास स्वाईन फ्ल्यूू आजाराची लागण झाल्याच्या संशयावरून फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयात त्याच्यावर अधिक उपचार सुरू असून त्याची प्रकृती ठीक असल्याचे उपजिल्हा रुग्णालयाकडून कळविण्यात आले आहे. मिरढे तालुका फलटण येथील 17 रुग्ण ताप,सर्दी,खोकला या कारणाने आजारी असल्याचे आढळले,यापैकी तिघा जणांना स्वाइन फ्लूसदृश आजारांची लागण झाली असल्याची माहिती घेऊन बरड उपकेंद्राने त्या-त्या संशयित रुग्णांवर घरीच उपचार सुरू केले आहेत. लोकांना आवाहन करण्यात आले आहे की चार दिवसापेक्षा जास्त अंगावर ताप असल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा तसेच आपल्या आसपास कोणी आजारी असल्यास त्याला अधिक उपचाराकरता 24 तास राजाळे, तरडगाव, साखरवाडी, बिबी, गिरवी, बरड या उपकेंद्रावर आरोग्य कर्मचारी एक पुरुष एक महिला व एक आरोग्य सेवक असे मिळून 31 लोक आहेत याच बरोबर त्यांनी टमी फ्लूच्या गोळ्या व 400 लस उपलब्ध असून कोणीही घाबरून न जाता त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधावा असे तालुका वैद्यकीय अधिकारी (प्रभारी) डॉ. आर एम.जगदाळे यांनी सांगितले आहे;
फलटण तालुक्यात सात उपकेंद्र आहेत यामध्ये दोन अधिकारी आवश्यक असताना प्रत्येक ठिकाणी फक्त एकच वैद्यकीय अधिकारी असल्याने त्या आसपासच्या गावातील लोकांना ते वैद्यकीय अधिकारी भेटत नसल्याने स्वाईन फ्ल्यूने डोके व वर काढण्यापूर्वी या सातही ठिकाणी अजून वैद्यकीय अधिकारी यांची नेमणूक करून जनतेला 24 तास सेवा देण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी सर्वसामान्य जनतेकडून होत आहे.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular