Monday, June 23, 2025
Homeठळक घडामोडीपंढरपूर महामार्गावर ट्रक-ओमनी कार अपघातात दोन ठार

पंढरपूर महामार्गावर ट्रक-ओमनी कार अपघातात दोन ठार

फलटण : महाड पंढरपूर मार्गावर राजुरी गावच्या हद्दीत हॉटेल सूर्योदयच्या समोर मारुती ओमनी कार (व्हॅन) व ट्रेलर (मोठा ट्रक) चा भीषण अपघात झाला असून या मध्ये ओमनी कार मधील एका महिलेचा जागीच मृत्यू झाला असून एका व्यक्तीला अधिक उपचारासाठी नेत असताना मृत्यू झाला असून एक गंभीर जखमी आहे व इतर तिघे किरकोळ जखमी झाले आहेत.
याबाबत घटनास्थळी मिळालेल्या माहितीनुसार आळंदी पंढरपूर रोडवर राजूरी ता.फलटण गावच्या हद्दीत हॉटेल सूर्योदय समोर पंढरपूर वरून देवदर्शन करून येत असलेल्या ओमनी कार नं. ाह-12-र्लीं-4794 व ट्रेलर (मोठा ट्रक) नं. ाह-04-लि-6590 फलटण वरून नातेपुते च्या दिशेने निघाला होता या दोन्ही वाहनांमध्ये आज रविवारी दि.14 रोजी सकाळी 6.15 च्या दरम्यान हा अपघात घडला असून या मध्ये ओमनी कार मधील सुगंधा धोंडिबा इंदलकर वय 65 वर्षे या जागीच ठार झाली तर चालक अनिल बाळकृष्ण गायकवाड वय 31 अधिक उपचारासाठी फलटण कडे नेत असताना त्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला असून या अपघातात सुरेश जयसिंग बोन्द्रे(संकपाळ), भानुदास लक्ष्मण बोन्द्रे(संकपाळ),शिवाजी लक्ष्मण बोन्द्र े(संकपाळ), जीवन सुरेश बोन्द्रे (संकपाळ) सर्व रा.मुरूम ता.फलटण हे किरकोळ व गंभीर जखमी झाले असून ट्रेलर चा चालक फरार असून त्याच्या विरोधात राजकुमार गुलाबराव संकपाळ यांच्या खबरीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे, पंढरपूर येथून देवदर्शन करून येत असताना हा काळाचा घाला पडला असून ओमनी कारचा अक्षरशः चुरा झाला आहे. या अपघाताचा अधिक तपास सहा.पोलीस उपनिरीक्षक एस. एस. बोमले करीत आहेत.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular