फलटण : फलटण पुणे मार्गावर फलटण नगर परिषद हद्दीतील जुन्या जकात नाक्याच्या ठिकाणी कार व मोटरसायकलच्या अपघातात एक जण गंभीर जखमी झाला असून आज आळंदी ते पंढरपूर मार्गावर तीन विविध अपघात झाल्याने आजचा रविवार घातवार ठरला या अपघाताच्या घटनांमुळे फलटण तालुका हादरून गेला आहे. वडजल व बरड तालुका फलटण येथे अपघात घडल्यानंतर दुपारी 1 वाजण्याच्या दरम्यान कार क्र ाह 20 लू 2689 दुचाकी क्र ाह-11 लव 3807 यामध्ये भीषण धडक होऊन मोटरसायकल चालकाचे डोके कारच्या आदळून तो रस्त्यावर फेकला गेला या अपघातात चालकाच्या डोक्यास गंभीर इजा होऊन रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. हा अपघात नक्की कसा झाला व यामध्ये अधिक कोण जखमी झाले याबाबतची माहीती अद्याप पोलीस ठाण्यात कोणीही दिली नसल्याने याबाबत रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता.
मारुती कार व मोटरसायकलच्या अपघातात एक जखमी
RELATED ARTICLES