Monday, June 23, 2025
Homeठळक घडामोडीदुचाकी चोरणार्‍या संशयित तरुणाला अटक; पाच मोटार सायकली हस्तगत

दुचाकी चोरणार्‍या संशयित तरुणाला अटक; पाच मोटार सायकली हस्तगत

फलटण : फलटण शहर, ग्रामीण व सासवड पोलीस ठाणे हद्दीतील मोटार सायकल चोरणार्‍या संशयित तरुणाला फलटण शहर पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून पाच मोटार सायकल हस्तगत करण्यात आल्या असून आणखी मोटार सायकल मिळून येण्याची शक्यता आहे.
याबाबत फलटण शहर पोलिस ठाण्यातुन मिळालेल्या माहितीनुसार, फलटण शहर पोलीस ठाणेचे गुन्हे प्रकटीकरण पथकाला मिळालेल्या बातमीच्या वरुन संशयीत इसम नवनीत रणजीत आगवणे रा निभोरे ता फलटण जि सातारा यांस ताब्यात घेवून त्यांचे कडे बारकाईने विचारपुस केली असता त्याने फलटण शहर / ग्रामीण व सासवड पोलीस ठाणे हद्दीतील माटार सायकल चोरल्या बाबत कबुली दिलेली असून त्यावरून त्यांचे कडून त्याने घरी ठेवलेल्या व मित्रांना विक्री करण्याकरिता दिलेल्या एकूण पाच मोटार सायकली जप्त करण्यात आलेल्या आहेत
. त्यापैकी 1) शितलकुमार फुलचंद दोशी लक्ष्मीनगर फलटण यांची स्प्लेंडर मोटार सायकल सिटी बझार समोर शुभम प्लाझा अपार्टमेंटचे पार्कीग मधून 2) बाळासो शिवाजी आडके दुधेबावी ता फलटण यांची हिरो होंडा कंपनीची सी डी डॉन त्रिमुर्ती रेसिडन्सी भुजबळमळा कोळकी येथून 3) सलिम खशाबा देवकाते रा भुजबळमळा कोळकी यांची पल्सर मोटार सायकल त्रिमुर्ती रेसिडन्सी भुजबळ मळा कोळकी येथून 4) उदय कुमार वसंतराव जगताप रा सासवड जि पुणे यांची स्लेंडर प्लस मोटार सायकल सासवड एस टी स्टॅण्ड येथून 5) एक हिरो कंपनीची एच एफ डिलक्स मोटार सायकल अनोळखी मोटार सायकल काही दिवसांपुर्वी चोरी केल्या असल्याचे निष्पन्न झालेले आहे .एकूण 1 लाख 30 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करणेत आलेला आहे. नमुद सराईत गुन्हेगार असून आणखी मोटार सायकल मिळून येण्याची शक्यता आहे. सदरची कारवाई पोलीस अधिक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर पोलीस अधिक्षक धिरज पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी सुहास गरुड, यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक पी. डी. पोमण, पोलीस उप निरीक्षक एस पी गायकवाड, पोलीस हेड कॉन्स्टेबल 1407 रत्नसिंह सोनवलकर , पोना 2260 सर्जेराव सुळ, पोकॉ 592 सुजित मेंगावडे, पोकॉ 19 नितीन चतुरे यांनी सदरची कारवाई केलेली आहे .

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular