फलटण : कुक्कुट पक्षी संगोपन योजने अंतर्गत उभारण्यात आलेल्या पोल्ट्री शेड बाबतचे अनुदानाची फाईल वरिष्ठांना सादर करण्यासाठी दोन हजार रुपयांची लाच घेताना बरड येथील सहाय्यक पशुधन विकास अधिकारी यांना अटक करण्यात आली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, तक्रारदार यांचे आईचे नावे असलेल्या 1000 मांसल कुक्कुट पक्षी संगोपन योजने अंतर्गत उभारण्यात आलेल्या पोल्ट्री शेड बाबतचे अनुदानाची फाईल वरिष्ठांना सादर करण्यासाठी डॉक्टर दिलीप महादेव नाझीरकर (वय 50 वर्षे), सहाय्यक पशुधन विकास अधिकारी (डॉक्टर), वर्ग-3, पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी-2, बरड ता. फलटण जि. सातारा सध्या रा. फ्लॅट नंबर 16 नारायण अपार्टमेंट, चिंचकर इस्टेट टी. सी कॉलेज पाठीमागे बारामती, मूळ रा. खटके वस्ती, पोस्ट गोखळी ता. फलटण, जि. सातारा यांनी तक्रारदार यांना दि. 4.9.2019 पडताळणी केली असता 2,500/- लाचेची मागणी केली दि. 6.9.2019 रोजी सापळा लावला असता तडजोड अंती 2,000/- लाच स्वीकारली असता दिलीप नाझीरकर यांना रंगेहात पकडले. दिलीप नाझीरकर यांच्या विरोधात फलटण शहर पोलिस स्टेशनला भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम व अपहरण अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई राजेश बनसोडे,पोलीस अधीक्षक लाप्रवि पुणे, श्रीमती सुषमा चव्हाण, अपर पोलीस अधीक्षक, लाप्रवि पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली अशोक शिर्के, पोलीस उपअधीक्षक, संजय अडसूळ, प्रशांत ताटे, संभाजी काटकर, विशाल खरात, तुषार भोसले लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, सातारा यांनी केली आहे.लाच मागणी संदर्भात तक्रारी असल्यास पोलिस उपअधीक्षक, लाच लुचपत प्रतिबंध विभाग, सदर बझार, सातारा येथे अथवा कार्यालय दूरध्वनी क्रमांक 02162/238139 तसेच 1064 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क करावा, असे लाच लुचपत प्रतिबंध विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.
सहाय्यक पशुधन अधिकारी दोन हजाराची लाच घेताना जाळ्यात
RELATED ARTICLES