Friday, June 20, 2025
Homeठळक घडामोडीट्रक चालकांना लूटणार्‍या टोळीतील दोघांना अटक

ट्रक चालकांना लूटणार्‍या टोळीतील दोघांना अटक

फलटण : दहिवडी – फलटण रोडवर झिरपवाडी गावाजवळ ट्रक चालकांना लूटमार करणार्‍या टोळीतील दोघांना अटक करण्यात आली आहे.
फलटण शहर पोलिस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी ट्रक चालक नामे राजू मुन्सीलाल शिवहरी, वय 32 वर्षे, रा. सिटी कोतवाली, जि. भिंड, राज्य. उ प्रदेश हे रात्री 3 वाजण्याच्या सुमारास ट्रक क्रमांक युपी 92 टी 9667 दहिवडी कडून फलटण कडे येत होते. झिरपवाडी गावचे हद्दीत वर्षा ठाब्याच्या पाठीमागे 1 किलोमिटर अंतरावर दोन मोटार सायकल वरील चार इसमांनी गाडी आडवी लावून ट्रक थांबवला व केबीन मध्ये घुसून फिर्यादीस मारहाण केली. नंतर वरील फिर्यादीने शिट खाली ठेवलेले 23 हजार रूपयांची लूट करून ते दहिवडी बाजूकडे निघून गेले. सदर ट्रक चालक हा पुढे कोळकी जवळ आला असता त्यास फलटण शहर पोलीस ठाण्याकडील रात्रगस्त करीता असलेली पीसीआर मोबाईल दिसली. फिर्यादी याने सदरची हकिकत पीसीआर मधील पोलीस कर्मचारी यांना सांगितली.


मिळालेल्या माहिती वरुन सदरची पीसीआर मोबाईल दहिवडी रोडला रवाना झाली. त्याचवेळी झिरपवाडी गावचे हद्दीत एक मोटार सायकल वरील दोन इसम टेम्पोंचा पाठलाग करीत असलेले दिसून आले. नमुद पीसीआर मधील कर्मचारी यांनी मोटार सायकल चालकांस थांबण्यास सांगितले असता त्यांनी न थांबता पुढे निघून गेला. मोटार सायकलकाचा संशय आल्याने पीसीआर मोबाईलने त्यांचा पाठलाग सुरु केला. काही अंतर पाठलाग केले नंतर सदर मोटर सायकल ही मुख्य रस्ता सोडून आड रस्त्याला गेले. तरी सुद्धा पीसीआर मोबाईल ने त्यांचा पाठलाग चालूच ठेवला. कोळकी गावचे हद्दीत त्यांची गाडी सौम्य धक्याने पाडली व मोटार सायकलवरील शंकर वसंत पवार (वय 35) व दिनेश राजेश पवार (वय 35, दोघे रा. सोमवार पेठ फलटण एकास जागीच पकडले व दुसर्‍याचा पाठलाग करुन पकडले. भादवि कलम 394, 341, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. यामधील आणखी दोन फरारी आरोपीचा शोध चालू आहे.
सदर आरोपींना अटक करण्यात महत्वाची भूमिका पीसीआर मोबाईल मधील चालक संदिप मदने, सहाय्यक पोलीस फौजदार वसंत जगन्नाथ सावंत व होमगार्ड महेश पाटील यांनी केली. सदर गुन्हयाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक बनकर हे करीत आहेत.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular