महिला, लहान मुले व युवक गंभीर जखमी; मारहाणीचा निषेध
फलटण : अनंतचतुर्दशी निमित्ताने निघालेल्या गणपती विसर्जन मिरवणुकीवर पोलिसांनी केलेल्या लाठीचार्ज मध्ये मिरवणूक बघण्यास आलेल्या महिला, लहान मुले व युवक गंभीर जखमी झाले असून या पोलीसांच्या अमानुष लाठी हल्ल्याचा सर्वच गणेश मंडळांनी निषेध केला असून या बाबत पुढील निषेध नोंदवण्यासाठी गजानन चौक येथे बैठक घेऊन संबंधित पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे अशी मागणी केली आहे. गणेशोत्सवावेळी फलटण पोलिसांची मिरवणुक बघण्याकरीता आलेल्या नागरिकांना अमानुषपणे मारहाण केल्याची घटना घडली असून या मारहाणीमुळे फलटण तालुक्यातील नागरिकांनी पोलीस प्रशासनाच्या मारहाणीचा निषेध केला आहे.
दरवर्षी फलटण शहरातील मोठ्या गणेश मंडळाची मिरवणूक गजानन चौक, जबरेश्वर मंदिर व राममंदिर, श्रीराम चौकी येथुन निघते यावेळी मिरवणूक बघण्यासाठी फलटण तालुक्यातील नागरिक मोठ्या संख्येने यावेळी येतात. रात्री 10:30 वाजण्याच्या सुमारास जबरेश्वर मंदिर येथे दगडीचाळ व अमरज्योती गणेशोत्सव मंडळ या मंडळाच्या गणपतीची मिरवणूक सुरू होती यावेळी रस्त्याच्या दुतर्फा व बँकेच्या समोर नागरिकांची मिरवणूक बघण्यासाठी मोठी गर्दी होती. यावेळी अचानक पणे उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे व पोलीस निरीक्षक प्रताप पोमन, पोलीस उपनिरीक्षक दळवी यांनी 60 ते 70 पोलीस कर्मचारी समावेत आले व त्यांनी मिरवणूक बघणार्या नागरिकांना मारहाण करण्यास सुरुवात केली. अचानकपणे लाठीमार होत असल्याने त्याठिकाणी लहान मुले, महिला व पुरुष तसेच वयोवृद्ध नागरिकांची धांदल उडाली व चेंगराचेंगरी झाली. यावेळी काही नागरिकांनी चेंगराचेंगरीत खाली पडलेल्यांना उचलून बाजूला केले यामुळे मोठा अनर्थ टळला.
काही वेळाने श्रीराम चौकी येथे रविवारी पेठ, शुक्रवार पेठ व उमाजी नाईक चौक या मंडळाची मिरवणुक सुरू होती यावेळी या ठिकाणी रस्त्याच्या दुतर्फा मिरवणूक बघण्यासाठी उभ्या असलेल्या नागरिकांच्यावरही उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे व पोलीस निरीक्षक प्रताप पोमन, पोलीस उपनिरीक्षक दळवी यांनी 60 ते 70 पोलीस कर्मचारी यांनी लाठीचार्ज करत मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी बहुतांश महिला व लहान मुलांना मारहाण करण्यात आली.
पोलिसांकडून मारहाण करण्यात आलेल्या ठिकाणी चप्पल व बूटाचा मोठा खच पडला होता. अनेक वर्षांपासून फलटण शहरात गणेशोत्सव मिरवणूक काढण्यात येते. फटाक्यांची आतिषबाजी, फुलांची सजावट, देखावे, पारंपरिक वाद्य यांच्या मिरवणूक काढण्यात येते. फलटण तालुक्यातील तसेच शहरातील लहान मुले, जेष्ठ नागरिक, महिला मोठ्या संख्येने मिरवणूक बघण्यासाठी येतात. यापूर्वी कधीही मिरवणुकी दरम्यान नागरिकांनी पोलीस प्रशासनावर सुव्यवस्था राखण्यासाठी ताण येऊ दिला नव्हता. वेळेचे नियोजन करत सर्व गणेशोत्सव मंडळानी गणेश मूर्तीचे विसर्जन केले होते. आजअखेर नागरिकांनी अथवा गणेश मंडळांनी पोलीस प्रशासनास सहकार्य केले होते असे असताना विनाकारण पोलीस प्रशासनाने केलेल्या मारहाणीचा फलटणकरांतुन निषेध व्यक्त करण्यात येत आहे व या घटनेच्या निषेधार्थ फलटण बंद करण्याचा इशारा सर्व गणेशोत्सव मंडळांनी दिला आहे याबाबतचे निवेदन उपविभागीय अधिकारी फलटण यांना देण्यात आले आहे.
पोलीस विरुद्ध जनता चित्र व्हायला नको गणपती मिरवणुकीत दिवशी झालेल्या लोकांना मारहाण योग्य नव्हे त्याची योग्य ती चौकशी व्हावी अशा सूचना पण प्रशासनाला केल्या असून योग्य ती कारवाई लवकरच होईल आयएएस ऑफीसर मार्फत व्हिडीओ फुटेज पाहिले जाईल.जिल्हा पोलिस प्रमुख सातपुते मॅडमशी बोलणे झाले,असुन मुख्यमंत्रीसाहेबांचा दौरा झाल्यानंतर मॅडम स्वतः सर्व मंडळांच्या प्रतिनिधींशी बोलणार आहे
– खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर
फलटणला विसर्जन मिरवणुकीवर पोलिसांचा लाठीचार्ज
RELATED ARTICLES