फलटण : लोणंदच्या दिशेने फलटणकडे येणार्या 10 चाकी ट्रक येथील स्मशानभुमी येथील कॉर्नरवर चालकाचा ताबा सुटल्याने ट्रक रस्ता सोडुन चारीमध्ये पलटी झाला.यामध्ये चालक किरकोळ जखमी झाला आहे.
याबाबत पोलिस ठाण्याने दिलेल्या माहिती अशी की, आज पहाटेच्या सुमारास लोणंदकडुन फलटणकडे येणार्या 10 चाकी ट्रक क्र. चक 25 ण 7815 यावरील चालक अजय नाशिवंत लिंबारे,रा.गुरवाई, ता. मरगा, जि.उस्मानाबाद याचा ताबा सुटुन ट्रक पलटी झाला. या अपघातामध्ये चालक किरकोळ जखमी झाला असुन याबाबतची फिर्याद अजय लिंबारे यांनी दिली असून अधिक तपास पोलिस करीत आहेत.
चालकाचा ताबा सुटल्याने ट्रक पलटी
RELATED ARTICLES

