फलटण : फलटण नगरपरिषदेच्या सफाई कामगार ठेकेदाराला दहा लाख रुपयांची खंडणी मागितल्या प्रकरणी व खंडणी न दिल्यास जिवे मारण्याची धमकी दिल्याची घटना घडली असुन याप्रकरणी एक जणांविरोधात फलटण शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फलटण नगरपरिषद सफाई कामगार ठेकेदार संग्राम श्रीकांत अहिवळे वय 28 रा.महतपुरा पेठ, ढोरगल्ली, मलठण यांना नगरपालिकेचा ठेका घेतलेच्या कारणावरून शाम सुभाष अहिवळे रा.मंगळवार पेठ फलटण हा नेहमी म्हणायचा की मला ठेका घ्यायचा आहे. तु ठेका घ्यायचा नाही परंतु संग्राम त्यास दाद देत नव्हता दि. 27/08/2019 रोजी संग्राम व त्यांचा जोडीदार अक्षय अमोल अहिवळे यास त्याच्या घरी गेलो असता रात्री 8:30 च्या सुमारास मंगळवार पेठ फलटण येथील पाण्याच्या टाकी जवळ रोडवर उभा असताना शाम अहिवळे याने संग्राम यास थांबववून पाण्याच्या टाकीकडे बोलावून म्हणाला की, माझ्या विरुद्ध मर्डरची केस सुप्रिम कोर्टात चालू आहे. तेथे जाण्यासाठी व केसच्या खर्चासाठी दहा लाख रुपये दे असे म्हणून पैशाची मागणी केली. त्यास संग्राम म्हणाला की येवढे पैसे मी कोठून देणार असे म्हणल्यावर तु पैसे देणार की नाही असे दमदाटीने बोलल्यावर त्यास नाही असे म्हणताच शाम अहिवळे याने तेथेच मला हाताने मारहाण करून कुठे काही बोललास तर जिवे मारीन तुझ्याच कामगारांना तुझ्या विरूद्ध तक्रारी करायला सांगेल असा दम दिला म्हणून मी कोणाशी काही बोललो नाही.
परंतु आज नगरपालिकेच्या आवारात शाम अहिवळे याने दमदाटी करून तु मला 30 कामगारांचा पगार दे असे म्हणून पैशाची मागणी केली होती. व ते न दिल्यास जिवे मारीन अशी धमकी दिली असून याच्या पासून माझ्या जिवितास धोका आहे अशी फिर्याद फलटण शहर पोलिस ठाण्यात देण्यात संग्राम अहिवळे यांनी दिली असून अधिक तपास सपोनि वृषाली देसाई करीत आहेत.
दहा लाख रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी एकास अटक
RELATED ARTICLES