जुन्या शासकीय धान्य गोदामास शॉर्ट सर्किटमुळे आग
फलटण : येथील शासकीय विश्रामगृह शेजारी मतदानाचे साहित्य ठेवण्यात आलेल्या नवीन धान्य गोदामा शेजारील जुन्या शासकीय धान्य गोदामास शॉर्ट सर्किटमुळे आग लागली हि लागलेली आग लगेचच लक्षात आल्याने नगर परिषद अग्निशमन दलाने विजवल्याने लाखों रुपयाचे धान्य वाचले.
दि. 23 रोजी सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास शासकीय धान्य गोदामास शॉर्ट सर्किट मुळे आग लागली यामध्ये यावेळी उपस्थित लोकांना आग लागल्याचे लक्षात येताच कर्मचारी यांनी सांगितले. यावेळी गोदामाची चावी नसल्याने शेटरचे कुलूप तोडून नगर परिषदेच्या अग्निशमन दलाच्या बंबाने आग आटोक्यात आणली. या जुन्या शासकीय गोदामात 2322.50 क्विंटल गहू, 2449 क्विंटल तांदूळ, 70 क्विंटल साखर, 213.50 क्विंटल तूरडाळ, 130 क्विंटल चणाडाळ या धन्याचा लाखो रुपये किंमतीचा साठा ठेवण्यात आला होता. यावेळी आगीत हमाल बिल रजिस्टर, 2 टेबल, 4 खुर्ची, 2 पंखे जळले असल्याची माहिती पुरवठा विभागाने दिली.
मतदानाचे साहित्य ठेवण्यात आलेल्या नवीन धान्य गोदामास शेजारील जुन्या शासकीय धान्य गोदामातील महावितरणच्या वीज मीटर मधून वीज कनेक्शन घेतले होते कुलर, फॅन, ट्यूब यांचा लोड एकाच मिटरवर आल्याने शॉर्ट सर्किट होऊन ही आग लागली असल्याची शक्यता गोदामाची पहाणी केल्यानंतर महावितरणच्या अभियंता शरद येळे यांनी व्यक्त केली.
RELATED ARTICLES