सातारा : सातारा येथील प्रसिद्ध किरण आर्ट्सचे चालक चंद्रशेखर उर्फ किरण रंगराव नावडकर ( वय 62) यांचे पुणे येथे गुरुवारी निधन झाले. गेले काही दिवस त्यांना उपचारासाठी पुणे येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
त्यांच्या मागे पत्नी छाया, रोहित व रणजित ही दोन विवाहित मुले, सुना, नातवंडे असा कौटुंबिक परिवार आहे. त्यांचा मित्र परिवार मोठा आहे. त्यांच्या निधनाची वार्ता समजताच अनेकांनी त्यांच्या सातारा येथील पोवई नाक्यावरील निवासस्थानी धाव घेतली.
1982 साली त्यांनी सातारा येथे किरण आर्ट्स या नावाने प्रिटिंग व लग्नपत्रिका छपाई चा व्यवसाय सुरु केला. व अल्पावधीतच हा व्यवसाय नावारूपाला आणला. प्रगतशील शेतकरी म्हणून त्यांनी शेतीमध्ये नवनवीन प्रयोग यशस्वी केले. सामाजिक, शैक्षणिक कार्याची त्यांना आवड होती. अनेक गरजुंना त्यांनी मदत केली.
किरण नावडकर यांचे निधन
RELATED ARTICLES