2814 क्युसेस विसर्ग सुरु, नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
परळी : परळी खोऱयात मुसळधार पाऊस सुरु असून या परिसरातील लघु पाटबंधारे तलाव पुर्ण क्षमतेने भरले असून उरमोडी प्रकल्प ही भरला असून या प्रकल्पातून आज सायंकाळी 5.30 वाजता पाण्याचा विसर्ग करण्यात आला. धरणाच्या पहिल्या अन् चौथ्या वक्र दरवाज्यातून पाणी सोडण्यात आले.
उरमोडीच्या सांडव्यातून 2364 क्युसेस तर विद्युत प्रकल्पातून (पावर हाऊस) मधून 450 क्युसेस विसर्ग करण्यात आला आहे. एकूण 2814 क्युसेस विसर्ग करण्यात आला असून प्रकल्पामध्ये 8.45 टीएमसी (87.56 टक्के) इतका पाण्याचा साठा आहे.
उरमोडी प्रकल्पातून पाणी सोडण्या आगोदर सर्व गावांना कृष्णा सिंचन विभागाच्या वतीने संचित करण्यात आले होते. सांडव्यातून विसर्ग करताना कार्यकारी अभियंता प्रकाश जाधव, सहाय्यक कार्यकारी अभियंता नितिश पोदार, शाख अभियंता गणेश कणसे उरस्थित होते. तसेच पाणी सांडव्या आधी दोन वेळा भोंगा वाजवून सुचित करण्यात आले होते.
उरमोडी भरले
RELATED ARTICLES