Friday, June 20, 2025
Homeठळक घडामोडीकडकनाथप्रकरणी फसवणूक संचालकांवर गुन्हा दाखल करणार

कडकनाथप्रकरणी फसवणूक संचालकांवर गुन्हा दाखल करणार

जिल्हा पोलीस अधीक्षक सातपुते यांचे आश्वासन
सातारा : कडकनाथ कोंबडी पालकांना फसवणार्‍या कंपनी संचालकांविरोधात अर्थिक फसवणूक, विश्वासघात, लबाडीच्या कलमान्वये अर्थिक गुन्हे अन्वेषण शाखा विभागात गुन्हा दाखल करण्यात येईल तसेच सर्व प्रकरणाचा अभ्यास करून एमपीआयडी अ‍ॅक्टखाली कठोर कारवाई करण्याची ग्वाही सातारा जिल्हा पोलीस प्रमुख तेजस्विनी सातपुते यांनी आंदोलकांना दिली.
कडकनाथ कोंबडी पालनातुन एकमेका सहाय करु अवघेची होऊ श्रीमंत हे घोषवाक्य घेऊन सांगली सातारा कोल्हापूर पुणे जिल्ह्यांसह संपूर्ण महाराष्ट्र कर्नाटक गुजरात राजस्थान छत्तीसगड अशा विविध राज्यांतील शेतकर्‍यांना महारयत अ‍ॅग्रो कंपनी आणि या कंपनीच्या सहा उपकंपन्यांच्या माध्यमातुन करोडो रुपयांचा गंडा घातला गेला. या प्रकरणी कडकनाथ ग्रस्त शेतकरी बांधवांनी त्या त्या भागातील स्थानिक पोलीस स्टेशनला धाव घेतली मात्र पोलिसांनी गुन्हा दाखल न करून घेता शेतकर्‍यांना पिटाळून लावले. संतप्त सातारा, कराड, पाटण, खटाव, माण, महाबळेश्वर, जावली आदीसह सातारा जिल्ह्यातील शेतकर्‍यांनी जिल्हा पोलीस प्रमुख कार्यालयाकडे शेकडोंच्या संख्येने धाव घेतली. यावेळी पोलीस प्रमुख सातपुते यांना निवेदन दिले.
पोलीस प्रमुख सातपुते यांनी प्रकल्प बाधीत शेतकर्‍यांची सहानुभूतीपूर्वक चर्चा केली या प्रकरणाचा सखोल अभ्यास करून दोषींवर कारवाई करण्यात येईल अशी ग्वाही देत पाटण येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याच्या सूचना केल्या दरम्यान त्यांनी पाटण पोलीस ठाण्यास दुरध्वनीद्वारे संपर्क साधून प्रकल्प बाधीतांचा गुन्हा दाखल करून घेण्याचे आदेश देण्यात आले. यावेळी सुमारे साडेचारशे कडकनाथ ग्रस्त शेतकर्‍यांच्या सह्यांचे निवेदन दिले. याप्रसंगी कॉ. दिग्विजय पाटील, प्रवीण काटकर, सुर्यकांत चव्हाण, प्रविण भिमराव गुजर, सचिन काशीनाथ शिर्के, शिर्के यांची प्रमुख उपस्थिती होती तसेच विद्रोही सांस्कृतिक चळवळ महाराष्ट्राचे कार्यकर्ते महेश गुरव, रोहित क्षीरसागर, शुभम ढाले, संकेत माने उपस्थित होते.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular