Saturday, June 21, 2025
Homeठळक घडामोडीएमएच - 11 हॉर्न विसरा

एमएच – 11 हॉर्न विसरा

11 सप्टेंबर रोजी सातार्‍यातून विद्यार्थी प्रभात फेरी काढणार
सातारा : कर्णकर्कश्यपणे वाजवला जाणारा हॉर्न हा आपल्या प्रकृती वर अनिष्ट परिणाम करतो. त्याकरिता एमएच -11 हॉर्न विसरा ही अभिनव संकल्पना उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय राऊत यांच्या संकल्पनेतून राबवली जात आहे. 11 सप्टेंबर रोजी चक -11 हॉर्न विसरा ही मोहीम राबवली जाणार असून त्या दिवशी सातारकरांनी हॉर्न वाजवायचा नाही या अभिनव प्रथेची सुरवात केली जाणार आहे.
या मोहिमेत शाळा व महाविद्यालयांचा सहभाग वाढवला जाणार असून त्या मोहिमेचा भाग असून रयत शिक्षण संस्थेच्या अण्णासाहेब कल्याणी विद्यालयात तब्बल बावीसशे विद्यार्थ्यांना हॉर्न नॉट ओके प्लीज ही स्टीकर वाटण्यात आल्याचे संजय राऊत यांनी सांगितले. एमएच 11 या मोहिमेत जिल्हाधिकारी कार्यालय, आरोग्य महसूल यंत्रणा, नगरपालिका, विविध महाविद्यालयांतील आरएसपी व एनसीसी जेसीओंची बैठक लवकरच घेतली जाणार आहे. 18 सप्टेंबर 2018 रोजी तत्कालीन वाहतूक उपायुक्त तेजस्विनी सातपुते यांच्या सहकार्याने नो हॉर्न प्लीज ही मोहिम पुण्यात राबवण्यात आली होती. या मोहिमेला पुणेकरांनी उदंड प्रतिसाद दिला.
संजय राऊत यांनी विद्यार्थी व शासकीय कर्मचारी यांना हॉर्न नॉट ओके प्लीज या आशयाचे बँड वाटले आहेत. विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांना मी हॉर्न वाजवणार नाही या आशयाचे पत्र भरून देणार असून ही पत्रे परिवहन कार्यालयाला जमा केली जाणार आहेत. 11 सप्टेंबर रोजी सातार्‍यातून विद्यार्थी प्रभात फेरी काढणार असून मी कधीही हॉर्न वाजवणार नाही अशी शपथ घेणार आहेत. सुप्रीम कोर्टच्या आदेशानुसार सुध्दा अपवादात्मक परिस्थितीत हॉर्न वाजवण्याची मुभा आहे. कर्कश हॉर्नचा परिणाम मानवी शरीर मेंदू, रक्ताची पातळी व दाब तसेच कोलेस्ट्रॉल यांच्यावर आपोआप होत असतो त्यामुळे सातारा सिटी सायलेंट सिटी ही संकल्पना प्रचलित करण्याचा आमचा मानस असल्याचे संजय राऊत यांनी सांगितले.11 ऑक्टोबर व नोव्हेंबर या दोन दिवशी सातार्‍यात पुन्हा हॉर्न विरोधी जनजागरण अभियान राबवले जाणार आहे. या उपक्रमाअंर्तगत ट्रक चालक, रिक्षा चालक, खाजगी चालक, नगरपालिका परिवहन विभाग यांची कार्यशाळा घेण्याचे नियोजन केले जाणार असल्याचे संजय राऊत यांनी स्पष्ट केले.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular