Sunday, June 22, 2025
Homeठळक घडामोडीमोबाईल टॉवरसाठी जागा द्या; भाड्याचे अमिष दाखवून होतेय फसवणूक

मोबाईल टॉवरसाठी जागा द्या; भाड्याचे अमिष दाखवून होतेय फसवणूक

असा फोन आल्यास तत्काळ पोलिसांशी संपर्क साधावा
सातारा : मोबाईल टॉवरसाठी जागा द्या, भरघोस उत्पन्न मिळण्याची संधी अशी जाहिरात तुमच्या वाचनात आली किंवा तसा फोन आल्यास तत्काळ सावध व्हा. पंचवीस हजार भाड्याचे अमिष दाखवून फसवणूक केली जाते एका महिला प्रतिनिधीकडून कागदपत्रे नंतर पाचशे रुपयांची मागणी दोन फोटो, पॅनकार्ड आधार कार्ड, बँक ऑफ बडोद्याचा 55500010000537 असा खाते क्रमांक दिला जातो. पाचशे रुपये भरल्यावर रिसीटची मागणी केली जाते त्यानंतर वारंवार रकमेची मागणी होते असे होत असेल तर वेळीच सावध व्हा असे आवाहन जिल्हा पोलीस दलाच्या सायबर विभागाने व आर्थिक गुन्हे शाखेने केले आहे.
पश्चिम महाराष्ट्रात शक्यतो अशा प्रकारचे येणारे कॉल हे उत्तर प्रदेश व बिहार राज्यातून येतात. सातारा जिल्हयात झटपट पैशाचे सर्रास मार्ग दाखवणार्‍या फसव्या कॉलची अनेक प्रकरणे झाली मात्र अशा प्रकरणात तक्रारदार पुढे येत नाही अशी माहिती आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अण्णासाहेब मांजरे यांनी दिली. या संदर्भात जिओ कंपनीचे कायदेशीर सल्लागार अ‍ॅड. मोहसीन इनामदार यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, कंपनीकडून असे कोणतेही टॉवर दिले जात नाही. अशा फसवणुकीच्या तक्रारी आमच्या पर्यंत नेहमीच येतात. कंपनीकडून पोलिसात तक्रार केली असली तरी फसवणूक झालेल्या व्यक्तींनी पुराव्यासह तक्रार दाखल केल्यास थेट कारवाईला मोठी बळकटी मिळू शकते.
सातार्‍यामध्ये काही मोबाइल कंपनीच्या अधिकार्‍यांनी जिल्हयात टॉवर देण्याच्या आमिषाने अनेकांची फसवणूक झाल्याचे सांगितले. मात्र पुराव्याअभावी आम्ही काहीच मदत करू शकत नाही असे इनामदार यांनी स्पष्ट केले. फसवणूक करणारी व्यक्ती अंजना महातो असून तिचा मोबाइल नंबर 8181866069, 7456804239 असे आहेत. या व्यक्तीचा कॉल आल्यास तत्काळ पोलिसांशी संपर्क करावा असे आवाहन करण्यात आले.
फसवणूक टाळण्यासाठी हे करा – कॉल आल्यास पुराव्यासाठी कॉल रेकॉर्ड करून तक्रार करणे, फेक कॉलकडे दुर्लक्ष करणे, पिन नंबर व बँक डिटेल्स कोणालाही न सांगणे हे लक्षात ठेवावे.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular