Thursday, October 16, 2025
Homeठळक घडामोडीनवरात्र उत्सवाला आजपासून प्रारंभ

नवरात्र उत्सवाला आजपासून प्रारंभ

शहरातील देवीच्या मंदिरावर आकर्षक रोषणाई
सातारा : नवरात्र उत्सवाला आज रविवारपासून प्रारंभ होत असून घरोघरी आणि शहरातील देवींच्या परिसरात व मंदिरात कुळाचाराप्रमाणे घटस्थापना होणार आहे. शहरातील देवीच्या मंदिरावर आकर्षक रोषणाई करण्यात आली असून नऊ दिवस सातार्‍यातील तुळजाभवानी, मंगळाई कासार देवी व घाटाईच्या मंदिराला रोषणाई करण्यात आली. अखंड दीप, दुर्गासप्तशतीचे पाठ, नवचंडी, कुमारीपूजन, होमहवन, भजन, कीर्तन, गोंधळ, जागरण आदी धार्मिक कार्यक्रमासोबत सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात सातार्‍याची मंगळाई देवी, औंधची यमाई. देवी, देवी चौकातील कासारदेवी व सातारा परिसरातील जानाई येथील देवी नवरात्रोत्सवाची तयारी जवळपास पूर्ण झाली असून मंदिरावर आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे.
चितारओळीत दुर्गा देवींच्या मूर्तींवर शेवटचा हात फिरविला जात असून मूर्तीकारांची लगबग वाढली आहे. बाहेरगावी जाणार्‍या अनेक मंडळांनी वाजत गाजत देवींची मूर्ती घेऊन गेले. आज, सकाळपासून चितारओळीत दुर्गा देवींच्या मूर्ती नेण्यासाठी धावपळ सुरू होणार असून घटस्थापना करण्यात येईल. शहरातील विविध भागात नवरात्र उत्सवाची तयारी जोमात सुरू झाली आहे. आकर्षक मंदिर उभारण्याचे काम जवळपास पूर्ण झाले आहे.
सदर बझार येथील भारत माता मंडळातर्फे गोवर्धन पर्वत, खण गाळी येथील मारवाडी मित्र मंडळ दुर्गा उत्सव मंडळातर्फे पशुपतीनाथ मंदिर, शिक्षकनगरमध्ये राजस्थान जैरासेलममधील जैन मंदिराची प्रतिकृती तयार केली जात आहे. या शिवाय देवी कॉलनीतील समाज मंदिर सभागृहाजवळ विशाल गुफा व भगवान शंकरजीच्या जटातून गंगा अवतरण असा देखावा तयार केला जात आहे. पोवई नाका आग्याराम व पारडीतील भवानी देवीच्या मंदिरात दहा दिवस भाविकांच्या गर्दीचा ओघ बघता मंदिर परिसरात पोलीस सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. या शिवाय शहरातील विविध भागात होणार्‍या गरबा दांडिया उत्सवाच्या ठिकाणी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी खासगी सुरक्षा व्यवस्थेसह पोलिसांचा बंदोबस्त राहणार आहे.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular